जाहिरात-9423439946
अपघातगुन्हे विषयक

टँकरची बैलगाडीस धडक,गाडीवान ठार,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मुंबई-नागपूर महामार्गावरील लौकी शिवारात रात्री १.१२ वाजण्याच्या सुमारास टँकरने (क्रं.एम.एच.११ ए. एल.१५४९) हॉटेल संस्कृती जवळ असलेल्या पुलावर बैलगाडीस धडक देऊन त्यात बैलगाडीवान विलास जीभाऊ पवार (वय-४०) रा.चौगाव बर्डी ता.सटाणा जिल्हा नाशिक हा ठार झाला असल्याची फिर्याद मुकादम रमेश शंकर मोरे (वय-३६) यांनी दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

अपघाताच्या घटनेनंतर त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी जखमी जीभाऊ पवार यास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयास भरती केले असता तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.दरम्यान घटनेनंतर आरोपी चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.पोलीस त्याचा शोध घेत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,सटाणा तालुक्यातील काकडगाव पो.सारद येथील ऊसतोड ठेकेदार रमेश शंकर मोरे यांचा कोपरगाव तालुक्यातील सहकारी साखर कारखान्याशी उसतोडीचा करार झाला असून त्यांनी त्यासाठी सटाणा तालुक्यातून ऊसतोड मजूर आणलेले आहे.ते थेट ऊस वाहतुकीचा व्यवसाय करतात.त्यातून त्यांना रोजगार मिळतो.आज पहाटेच्या १.१२ वाजेच्या सुमारास या ठेकेदारांची ऊसतोड करणारी टोळी हि ऊसतोडणी साठी जात असताना त्यास एका बैलगाडीस याच रस्त्यावरून वरील क्रमांकाचा वेगाने जाणारा टँकरने मयत विलास जीभाऊ पवार यांच्या गाडीस जोराची धडक दिली त्यात त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.तर या अपघातात त्यांच्या गाडीचा बैल गंभीर जखमी झाला असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.घटनेनंतर त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी जखमी जीभाऊ पवार यास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयास भरती केले असता तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.दरम्यान घटनेनंतर आरोपी चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.पोलीस त्याचा शोध घेत आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी वरील टँकरचा अज्ञात चालकाविरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.७२/२०२१ भा.द.वि.कलम ३०४(अ)२७९,३३८,४२७,४२९ मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४,(अ),(ब) १७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close