गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात एकाची आत्महत्या,
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील रवंदे ग्रामपंचायत हद्दीत काल तरुण अशोक सर्जेराव तासकर (वय-३५) याने अज्ञात कारणाने घरात असलेले पशुधनासाठी वापरण्यात येणारे गोचिडाचे विषारी औषध घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.त्यांच्यावर आज रवंदे येथे शव विच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले आहे.
त्यांच्या पाच्छात आई,वडील,मुलगा,दोन मोठे भाऊ असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाची कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.प्रदीप काशीद हे करीत आहेत.