जाहिरात-9423439946
पुरस्कार,गौरव

 ‘जलजीवन मिशन’ राबविताना काळजीपूर्वक राबवा-माजी खा.वाकचौरे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
 
वर्तमानात जलजीवन योजनेसाठी सरकारने मोठा निधी दिला असून सदर योजना राबवताना व पाण्याची टंचाई दूर करताना ग्रामपंचायतीच्या सरपंच व कार्यकर्त्यानी लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिर्डीचे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी नुकतेच केले आहे.

  

“वर्तमानात जमिनीचा पोत खराब झाला आहे.जलप्रदूषण वाढले आहे.वन क्षेत्र वाढविणे गरजेचे बनले आहे.”वर्तमानात खासदार,आमदार होणे सोपे आहे.मात्र सरपंच बनणे अवघड बनले आहे.त्यामुळे आगामी काळात विद्यमान सरपंच यांनी श्रावण बाळ योजना,संजय गांधी निराधार योजना,वृद्ध शेतमजूर आदी राबवाव्या”-माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे,शिर्डी लोकसभा मतदार संघ.

अलिकडच्या वर्षांत सरकार जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ‘वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर’ काम करत आहे.सर्वांसाठी घरे,प्रत्येक घराला वीज,प्रत्येक कुटुंबाला शौचालय, स्वच्छ स्वयंपाकाचा गॅस,आर्थिक समावेशन,सामाजिक सुरक्षा,परवडणारी आरोग्य सेवा यासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करणाऱ्या विविध सरकारी योजनांमुळे लोकांच्या,विशेषत: खेड्यात राहणाऱ्या नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.सर्वांसाठी,रस्ते,ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी,इ.आणि आता,लोकांची आकांक्षा त्यांच्या घरात आणि सार्वजनिक ठिकाणी पिण्यायोग्य नळ पाण्याचा पुरवठा आहे,जेणेकरून ग्रामीण-शहरी भेद दूर होईल.ग्रामीण भारताच्या या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलजीवन मिशन सुरु केले आहे.मात्र याकडे ग्रामीण पातळीवर प्रशासन आणि वर्तमान लोकप्रतिनिधी आदी गांभीर्याने पाहत नसल्याचे उघड होत आहे.त्यामुळे या योजनांची वाट लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यासाठी आज शिर्डीत लोकसभा मतदार संघाचे माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी नवोदित सरपंच,पदाधिकारी आदींचा मुंबई येथील मैत्री संस्था,शिर्डी येथील साई अर्पण संस्था व राज्य सरपंच परिषद आदींच्या संयुक्त विद्यमाने आज शिर्डीत नवोदित सरपंच,पदाधिकारी आदींचा सत्कार आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते.

   सदर प्रसंगी माजी खा.वाकचोरे यांच्या धर्मपत्नी सरस्वती वाकचौरे,लावणी सम्राज्ञी विजया कदम,समाजसेवक संगीता गुरव,अभिनेत्री राजश्री काळे,विजय भोसले,महेंद्र गाढवे,अमरजीत हुंजावर,लहामटे मामा,दिनेश घाडगे,शिवाजी शिंदे,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,महेंद्र सोनवणे,रोहित वाकचौरे,सूरज भोईर,सुभाष गायकवाड,सरपंच परिषदेचे रामनाथ बोऱ्हाडे,मुकुंद शिनगर,वहातूक सेनेचे जिल्हा प्रमुख इरफान शेख,राहाता तालुका प्रमुख सोमनाथ गोरे,वसंत महाडिक,भूषण कंबोडे,तेजस जांभोडेकर,सोमनाथ गायकवाड आदी प्रमुख उपस्थित होते.

   त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे महत्व कमी करण्यासाठी ७३ वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती.त्यामुळे ग्रामपंचायतीना महत्व वाढले व आर्थिक स्र्रोत वाढवला गेला त्यामुळे निधी येऊ लागला आहे.त्यामुळे आता पंचायती आपल्या पातळीवर विकास योजना राबवू लागल्या आहेत.त्यामुळे ग्रामीण पातळीवर दारिद्र्य निर्मूलन,रस्ते,आरोग्य,शिक्षण,जलसंधारण,समाजकल्याण,दुर्बल घटक विकास,घरबांधणी आदी विषय हाताळता येऊ लागले आहे.मात्र त्यासाठी सुज्ञ सरपंच त्या खुर्चीवर बसणे गरजेचे बनले आहे.मात्र वस्तुस्थिती वेगळी होत आहे.त्यामुळे अनेक पदाधिकारी गैरव्यवहारात अडकत आहे.आपण गटविकास अधिकारी असताना जिल्ह्यात विविध तालुक्यात काम केले आहे.त्यामुळे प्रशासकीय कामे करण्याचा अनुभव आपल्या पाठीशी आहे त्यामुळे लोकसभेत काम करताना आपल्याला अवघड गेले नाही त्यामुळे आपण मतदारांत संघात विविध विकास कामे सक्षमपणे करून शकलो आहे.आपण प्रारंभीच्या काळात राळेगण शिंदी,आणि हिवरे बाजार आदी ठिकाणी विकास कामे करण्यात मदत व विकासासाठी योगदान देऊ करू शकलो असल्याचा त्यांनी दावा केला असून त्याचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगितले आहे.या गावांची नावे आता देशपातळीवर घेतली जात आहे.
   वर्तमानात जमिनीचा पोत खराब झाला आहे.जलप्रदूषण वाढले आहे.वन क्षेत्र वाढविणे गरजेचे बनले आहे.”वर्तमानात खासदार,आमदार होणे सोपे आहे.मात्र सरपंच बनणे अवघड बनले आहे.त्यामुळे आगामी काळात विद्यमान सरपंच यांनी श्रावण बाळ योजना,संजय गांधी निराधार योजना,वृद्ध शेतमजूर आदी राबवाव्या असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.वर्तमान सरपंच यांनी आपण लोकसेवक असल्याचे भान ठेवणे गरजेचे असल्याचे सांगून गैरव्यवहार टाळावे असे आवाहन त्यांनी शेवटी माजी खा.वाकचौरे यांनी केले आहे.

सदर प्रसंगी प्रास्तविक महेंद्र सोनवणे यांनी तर सूत्रसंचालन यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close