जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

….’त्या ‘ जटाधारी बाबाच्या लीला उघड,ग्रामस्थांतून संताप !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)


कोपरगाव तालुक्यातील वायव्येस सोळा कि.मी.गोदावरी काठी काही वर्षापासून प्रस्थान बसवलेल्या एका जटाधारी बाबांच्या लीलांची जोरदार चर्चा सुरू असून सदर बाबांच्या शिष्यांनी राहुरी तालुक्यातील विश्व हिंदू परिषदेच्या चार चाकीतून जाब विचारण्यास आलेल्या तीन जणांना जोरदार मारहाण केली असल्याची बातमी असून याबाबत सदर बाबाचे पुणे येथील महिलेशी संबंध असून त्या महिलेने बाबाचे बिंग फोडल्यातून हा प्रकार घडला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे माहेगाव नजिक असलेल्या या गावातील बाबांची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.मात्र गणेशोत्सव असल्याने काही अनर्थ नको म्हणून पोलिस माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे समजते.

सर्व फोटो संकल्पित.

आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता..’तिने’ या प्रकरणी दुजोरा दिला असून त्यात तथ्य असल्याचे म्हंटले असून सदर महाराजांकडून आपल्यासारखे अन्य तरुणी आणि महिलांचे शारीरिक शोषण होऊ नये यासाठी आपण जनजागृतीचे हे पाऊल उचलले असल्याचे म्हंटले आहे.मात्र दुर्दैव असे की तेथील तरुण आणि ग्रामस्थ अजून जागे होत नसल्याबद्दल तिने तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

   सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहराच्या वायव्येस सुमारास सोळा किं.मी.गोदाकाठी असलेल्या गावात ग्रामस्थांनी आपल्या लोकवर्गणीतून लाखो रुपये खर्चून एक भव्यदिव्य रामेश्वर महादेवाचे मंदिर उभारले होते.त्यासाठी येथील महाराज यांनी मार्गदर्शन केले होते.मात्र सदर मंदिराच्या सेवेसाठी एकही महाराज नसल्याचे ग्रामस्थांची सल होती.त्यासाठी सदर महाराजांनी संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील मूळ रहिवासी असलेल्या जटाधारी बाबास सेवेसाठी शिफारस केली होती व त्यानुसार त्यांना भाविकांना सुपूर्त केले होते.बाबांनी आपले बस्तान हळूहळू बसवले होते.गावातील मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते भविकभक्त यांचा विश्वास संपादन केला होता.त्यातून मंदिर परिसर मोठा आकर्षक बनवला होता.त्यामुळे हळूहळू या मंदिरात भाविकांनी गर्दी वाढू लागली होती.गावातील प्रतिष्ठित मंडळी सकाळीच बाबांचे दर्शन करूनही शुभ कार्यात बाहेर पडत असत.बाबांचा शिष्य वर्ग हळूहळू वाढत गेला त्यातून अनेकांच्या ओळखी झाल्या होत्या.परिणामी बाबा प्रत्येक प्रदोष साजरा करत असत.अनेक कथा,प्रवचन,शिवपुराण कथन करत असतं.त्यातून मंदिर परिसरात अबालवृद्ध मोठ्या संख्येने जमत असत.त्यातून बाबाच्या सेवेत एक हिंदुत्ववादी महिला बाबांच्या संपर्कात आली होती.ती बाबांना भावाप्रमाणे मानत असल्याचे नव्हे तसे भासवत होती.त्यातून त्यांनी आपल्या कमाईचा मार्ग शोधून काढला होता.भोळ्या भाबड्या भाविकांना घरातील काही दोष काढण्यासाठी,आपल्या उपवर मुलांची लग्न होत नसल्यास विशिष्ट पूजा विधी सांगत व त्यातून त्यासाठी 40-45 हजारांचा खर्च येईल अशी बतावणी करून त्यांच्या कडून मोठा आर्थिक फायदा उपटत असत.त्यातून काही ज्येष्ठ नागरिकांना व काही कार्यकर्त्यांना बाबांच्या या लीलांचा संशय आल्याने त्यांनी त्या ठिकाणापासून अंतर राखण्यास सुरुवात केली होती.त्यातच बाबांच्या…’त्या’ पुण्याच्या ताईंचे सदर ठिकाणी येण्यास अंतर पडू लागले होते.त्यानंतर सदर ताईने आपले अंतर का पडले याचे काही सुज्ञ  नागरिकांना थेट सांगून टाकले होते व  त्यासाठी काही पुरावे थेट मोबाईल मधून सप्रमाण पाठवले होते.त्यातून बाबाच्या …’त्या’ लिलांचा सुगावा ग्रामस्थांना लागला होता.पूढे जावून सदर आपद्ग्रस्त महिलेला बाबाच्या अन्य लीला लक्षात आल्याने व एका अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढल्याने व आपल्यात अन्य तिसरा वाटेकरी झाल्याने प्रेमाचा त्रिकोण तयार झाल्याने संतापून त्यातून त्या दोघांमध्ये बेबनाव तयार झाला होता अशी चर्चा आहे.तिने स्थानिक अनेक ग्रामस्थांना बाबाच्या लीला लक्षात आणून दिल्या होत्या.सदर बाबा भोंदू असून त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन केले होते.त्यावेळी काही सुज्ञ नागरिकांनी तुम्ही तर बाबाच्या भगिनी म्हणून वावरत होत्या मंग असे का झाले असे चिकित्सक विचारणा केली असता…’त्या’ महिलेने बाबाने आपले कसे शोषण केले हेही थेट सांगून टाकले होते.व अन्य जी तरुणी जी बाबांच्या संपर्कात आली तिला सावध केले होते.मात्र बाबाने तिला एक दिवस फोनवर घेऊन…त्या ‘ अल्पवयीन तरुणीला वीस हजार रुपये देऊन तिच्या कडून उलट पुणेस्थित महिलेला सुनावले होते.मात्र सत्य फार दिवस लपत नाही हेच खरे.त्यातून पुढे जावून या जटाधारी बाबाने कोपरगाव शहरातील एका संगीताशी संबंधित महीलेला आपल्या जाळ्यात ओढले असल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात असून त्यामुळे ही लीला चांगलीच चर्चेला आली होती.मात्र पुणे स्थित महिलेने बाबाची जिरविण्याची ठरवली होती.त्यातून ती गावातील अनेकांना फोन करून सावध करत होती व हा बाबा भोंदू असल्याचे कळकळीने सांगत होती.मात्र त्यावर कोणी विश्वास ठेवायला आधी तयार नव्हते.मात्र जेंव्हा पुणेस्थित महिलेने या पाखंडी बाबांपासून सावध होण्यासाठी आपल्या मोबाईलवरून त्याचे पुरावे थेट एका ग्रामपंचायतच्या कनिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मोबाईलवर पाठवले व “या बाबाला आपण सोडणार नाही”काही तरुणांना पाठवून त्याचा बेत करणार असल्याचे हिने सांगितले होते.त्यातून त्याने सावध होण्याऐवजी सदर कनिष्ठ पदाधिकाऱ्याने थेट ते पुरावे बाबाला दाखवल्याने अनर्थ झाला असल्याचे समजले आहे.त्यामुळे बाबा सावध झाला होता.त्यामुळे अस्वस्थ बाबाने आपले प्रकृतीचे कारण देत शिवपुराण तीन दिवसात गुंडाळून ठेवले होते.व खाजगीत काही आपल्या विश्वासू मित्रांना सांगितले की,”आपल्यावर काही लोक नसते आरोप करत असल्याने आपण हे ‘शिवपुराण’ गुंडाळून ठेवले असल्याचे सांगितले होते.व आपल्याला काही लोक मारायला येणार असल्याचे सांगून स्थानिक ग्रामस्थांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला होता.परिणामी काही भोळ्या श्रद्धाळू भाविकांनी त्यावर विश्वास ठेवला होता.

दिनांक 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता त्या तरुणांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात एक अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून यात फिर्यादी तरुण हारेल रा.ब्राम्हणी याने आपल्या अल्टो कारचा क्रमांक नमूद केला असून आपली काही वृत्त वाहिन्यांनी खंडणी साठी आले असल्याची बदनामी केली असल्याचे म्हंटले आहे.

   दरम्यान गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एक चारचाकी तून तीन तरुण आले व त्यांनी बाबास जाब विचारण्यास सुरुवात केली होती.बाबाला आधीच सुगावा असल्याने त्याने आपले समर्थक आधीच तयारीत ठेवले होते.त्यांनी काही क्षणात आलेल्या तरुणांना मारहाण केली असून एकास चांगलेच जखमी केले असल्याची माहिती हाती आली आहे.


   दरम्यान या प्रकरणी तेथील पोलिसाशी संबधित एका कनिष्ठ कर्मचाऱ्याने पोलिसांना दूरध्वनी करून,काही तरुणांनी बाबांच्या कानाला पिस्तूल लावले असल्याचे सांगून बाबाकडे खंडणी मागितली असल्याचे फोन करून बोलावून घेतले होते.पोलिस अधिकारी पिस्तूल असल्याचे घाबरून घटनास्थळी दाखल झाले होते.त्यांनी दोन्ही गटांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले असता प्रकरण भलतेच निघाले.पोलिस अधिकाऱ्यांनी खंडणीचा आरोप असलेल्या तरुणांना,” तुम्हाला कोणी पाठवले ?  याची विचारणा केली असता त्यांनी,”आम्हाला पुणेस्थित महीलेने पाठवले होते” असे आपल्या जबानीत सांगितले होते.परिणामी पोलिसांनी सदर महिलेस फोन केला असता हे बिंग फुटले असून सदर महीलेने बाबांचा फोन पोलिस अधिकाऱ्यांना तपासण्यास सांगितले असता सगळे प्रकरण उघड झाले असून पोलिस अधिकाऱ्यांनी त्या भोंदू बाबास खाकीचा हिसका दाखवून चांगलेच सुनावले असून आपले चंबूगबाळ गुंडाळण्यास सांगितले असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

    दरम्यान तरीही काही गावातील श्रद्धा असलेले भोळे भाविक,”बाबा निरपराध असल्याचे “सांगत सुटले असल्याची माहिती असून एका अधिकाऱ्यास विचारणा केली असता बाबाने घटनास्थळावरून पोबारा केला असल्याची माहिती आहे तर काही सुज्ञानी त्या ठिकाणाहून आपले संबंध तोडले असल्याची माहिती आहे.यात बऱ्याच अंशी वाळुशी इसम असल्याची माहिती आहे.मात्र आमच्या प्रतिनिधीने त्याबाबत मागोवा घेतला असता बाबा अद्याप गावात ठाण मांडून असल्याची विश्वसनीय माहिती आहे.सदर जटाधारी बाबाशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.त्यासोबत सदर पुणेस्थित महिला,कनिष्ठ पदाधिकारी आदींचा फोन बंद असल्याचे दिसून येत आहे.

   दरम्यान या नव्याने व ताज्या मिळालेल्या माहिती नुसार,सदर महिलेने जटाधारी बाबाकडे तरुण पाठविण्याच्याआधी व घटनेच्या दोन दिवस बाबा सदर महीलेच्या घरी गेला होता. त्या ठिकाणी कॉलनीत गोंधळ घालून सदर महिलेलां मारहाण करून तिचा फोन ताब्यात घेऊन पोबारा केला होता व त्यानंतर बाबा गावात येऊन,”आपल्याला काही माणसे मारायला येणार असल्या”ची बतावणी करत होता.त्यानंतर ही 12 सप्टेबरची मारहाणीची घटना घडली आहे.पोलिसांनी बाबांकडून दोन्ही फोन ताब्यात घेतले होते.त्यावेळी त्यात बाबाने सदर महिलेशी केलेले चॅटिंग उघड झाले होते.त्यावरून बाबाचा पर्दाफाश झाला आहे.

   दरम्यान आज तालुका पोलिसांनी सदर महिलेचा बाबांकडून जप्त केलेला फोन सदर महीलेला आज सायंकाळी सहा वाजता परत केला असल्याची माहिती मिळाली आहे.तिने आपल्याला पोलिसांनी चांगली मदत केली असल्याचे गौरवोद्गार काढले आहे.तिच्याशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता तिने या प्रकरणी दुजोरा दिला असून त्यात तथ्य असल्याचे म्हंटले असून सदर महाराजांकडून अन्य तरुणी आणि महिलांचे शारीरिक शोषण होऊ नये यासाठी आपण जनजागृतीचे हे पाऊल उचलले असल्याचे म्हंटले आहे.मात्र दुर्दैव असे की तेथील तरुण आणि ग्रामस्थ अजून जागे होत नसल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

   या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात काल दिनांक 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता एक अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून यात फिर्यादी तरुण याने आपल्या अल्टो कारचा क्रमांक नमूद केला असून आपण व आपले सहकारी दिनांक 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 05 वाजता सदर महाराजांच्या आश्रमात भेटण्यासाठी गेलो होतो.त्या ठिकाणी महाराज आणि त्यांचे शिष्य आणि आमच्यात वाद झाले असल्याचे म्हंटले असून आम्ही तालुका पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास आलो होतो पण आमच्यात समझोता होऊन प्रकरण मिटले असताना काही वृत्तवाहिन्यांनी आमच्या गाडीचे तालुका पोलिस ठाणे येथील चुकीचे चित्रण करून आम्ही खंडणीसाठी गेलो असल्याच्या बातम्या प्रसिध्दी करून आमची बदनामी केली असल्याचे म्हंटले आहे.त्यामुळे आता हे प्रकरण नेमके कोणते वळण घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close