जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दरोड्याच्या तयारीत टोळी,दोन कारसह सात जणांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


    कोपरगाव तालुक्यातील शिर्डी-नाशिक मार्गावर देर्डे-कोऱ्हाळे फाट्यानजीक काल मध्यरात्रीच्या सुमारास गुप्त माहितीनुसार टाकलेल्या धाडीत तलवार,लोखंडी कत्ती,कटवणी,लाकडी दांडके,मिरची पूड आदी साहित्यासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळीतील सदस्य मयूर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड,अमोल उर्फ ऋतूंजय अविनाश कुंदे,समाधान देविदास राठोड,संदीप पुंजा बनकर,उमेश तानाजी वायदंडे,गणेश भिकुनाथ तेलोरे,राहुल शिवाजी शिदोरे आदी राहाता व कोपरगाव तालुक्यातील सात दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक केली असून दोन जण फरार झाले आहे.त्यांच्या ताब्यातील दोन चार चाकी वाहने जप्त केली असल्याचे राहाता-कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

  

दरम्यान त्यांनी सदर साहित्य हे दरोडा टाकण्याच्या तयारीने एकत्र केले असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संदीप कोळी व पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी घटनास्थळी भेट दिली असून आरोपीना आपल्या ताब्यात घेतले आहे.यातील चार आरोपी खून,दरोडा,जीवे मारण्याचा प्रयत्न अशा गंभीर गुंह्यातील असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

कोपरगाव तालुक्यात गतवर्षी मोठ्या प्रमाणावर गुन्हे वाढले होते.त्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले होते.त्यामुळे या आरोपीना पकडण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व त्यांच्या अधिकाऱ्यांपुढे आव्हान निर्माण झाले होते.मात्र अलीकडील काळात उत्तर नगर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठया प्रमाणावर बदल्या झाल्या आहेत.त्यामुळे गुन्हेगारांना आपले बस्तान बसवताना अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे त्यांना वाचक बसविण्यासाठी अ,नगर पोलिसांनी रात्री गस्त वाढवली असल्याचे दिसून येत आहे.त्यात त्यांना गुप्त खबऱ्यामार्फत खबर मिळाली की,देर्डे फाटा येथे एक टोळी आडोशाला लपून बसली आहे.त्या नुसार पोलिसांनी आपला मोर्चा सदर ठिकाणी वळवला होता.त्या नुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांची काल दि.१५ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असणाऱ्या पथकास एक सुझुकी एर्टीगा चार चाकी वाहन (क्रं.एम.एच.१३ सी.एस.३०५४) व एक पांढरे रंगाची व्होक्सवॅगन विंटॊ कार क्रं.एम.एच.०१ बी.एफ.६६३३) या संशयास्पद स्थितीत आढळून आल्या होत्या.नगर पोलिसांनी या प्रकरणी आपला मोर्चा सदर गाड्यांकडे वळवून त्या ठिकाणी धाड टाकली असता त्या ठिकाणी असलेले दोन संशयित इसम पळून जाण्यात यशस्वी झाले आहे.तर अन्य सात जण जागेवरच अटक केले आहे.त्या संशयित इसमांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली होती.त्यामुळे पोलीसांचा त्यांच्यावर संशय बळावला होता.त्यांनी अधिकची चौकशी केली असता व गाड्यांची झाडाझडती केली असता सदर गाड्यात एक तलवार,एक लोखंडी कत्ती,एक कटवणी,एक लाकडी दांडके,मिरची पूड आदी बेकायदा साहित्य आढळून आले होते.त्या बाबत त्यांनी पोलिसांना समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाही यावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता व अधिकची चौकशी केली असता त्यांनी हे साहित्य दरोडा टाकण्याच्या इराद्याने एकत्र केले होते अशी गंभीर बाब उघड झाली आहे.

   दरम्यान त्यांनी सदर साहित्य हे दरोडा टाकण्याच्या तयारीने एकत्र केले असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संदीप कोळी व पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी घटनास्थळी भेट दिली असून आरोपीना आपल्या ताब्यात घेतले आहे.यातील चार आरोपी खून,दरोडा,जीवे मारण्याचा प्रयत्न अशा गंभीर गुंह्यातील असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

   दरम्यान त्या टोळीतील सदस्य मयूर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड,(वय-२१),रा.१०५ इंदिरानगर कोपरगाव,अमोल उर्फ ऋतूंजय अविनाश कुंदे,(वय-२०)रा.एकरुखे,ता.राहाता.समाधान देविदास राठोड,(वय-२३) करंजी ता.कोपरगाव.संदीप पुंजा बनकर,(वय-३३)रा.द्वारकांनगर बनरोड शिर्डी,उमेश तानाजी वायदंडे,(वय-२७) गणेश भिकुनाथ तेलोरे,दोघे रा.गणेशनगर ता.राहाता.राहुल शिवाजी शिदोरे गोकुळनगरी कोपरगाव आदी राहाता व कोपरगाव तालुक्यातील सात दरोडेखोरांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातील दोन चार चाकी वाहने जप्त केली असल्याचे राहाता-कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान यातील आरोपी भुऱ्या अनिल गायकवाड याचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गंभीर प्रकारचे दोन गुन्हे असून एक राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून त्यात तेथे त्यावर मोक्का गुन्हा दाखल असून त्यात तो फरार आहे.तर दुसरा आरोपी अमोल अविनाश फुंदे यांचेवर लोणीत दोन,अश्वित एक,संगमनेर शहरात एक,राहाता तालुक्यात दोन असे दरोड्यासह गंभीर सहा गुन्हे दाखल आहेत.तर समाधान देविदास राठोड याचे विरुद्ध संगमनेर शहर व तालुका हद्दीत तीन गुन्हे तर शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक,तर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गुन्हा असे पाच गुन्हे दाखल आहे.तर उमेश वायदंडे याचे विरुद्ध शिर्डीत खून,दरोडा यासह दोन गुन्हे तर घारगाव,लोणी,राहाता येथे प्रत्येकी एक असे पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत.

   दरम्यान या आरोपी विरुद्ध फिर्यादी पो.कॉ.बाळासाहेब अशोक गुंजाळ स्थानिक गुन्हे शाखा अ.नगर यांनी गुन्हा क्रं.४१/२०२४। भा.द.वि.कलम-३९९,४०२ सह आर्म ऍक्ट कायदा कलम ४/२५ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपस पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाटेवाल हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close