जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

वाळू चोराचा तलाठ्यावर हल्ला,एक जणांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


    कोपरगाव तालुक्यातील काळ सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास गुप्त माहितीनुसार वाळू चोरी प्रतिबंधक पथक आपले धारणगाव ग्रामपंचायत हद्दीत गोदावरी नदीच्या कडेला वाळूचोरीचा ट्रॅक्टर पकडत असताना आरोपी विकी शिंदे (पूर्ण नाव,गाव माहिती नाही) याने फिर्यादी व देर्डे कोऱ्हाळे येथील तलाठी गणेश महादेव गरकळ (वय-३९) यांना  शिवीगाळ व धक्काबुक्की करत त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर पळवून नेला असल्याची धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे.त्यामुळे धारणगावसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

   

कोपरगाव तालुक्यातील धारणगाव हद्दीत गोदावरीनदी काठी वाळू उपसा प्रतिबंधक पथक गेले असता त्यांना वाळूचोरांने हिसका दाखवला आहे.त्यांना धक्का बुक्की करत व शिवीगाळ करत त्यांच्या डोळ्यादेखत आपले वाहन पळवून नेले आहे.त्यांना पाहण्याखेरीज काही करता आले नाही.त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गत दहा महिन्यापुर्वी ०१ मे २०२३ रोजी राज्याच्या महसूल मंत्र्यांनी ६०० रुपयांना एक ब्रास वाळूचे स्वप्न दाखवले होते त्यास दहा महिने उलटूनही गरजेइतकी वाळू तालुक्यातील नागरिकांना मिळालेली नाही.कोपरगाव तालुक्यात कुंभारी व सुरेगावात प्रत्येकी एक वाळू डेपो तयार केल्याच्या बातम्या असताना त्यात नागरिकांना दुर्दैवाने फारसा दिलासा मिळताना दिसत नाही.त्यात अनेक गैरप्रकार घडताना दिसत असून डेपो व वाळू उपसा ठिकाणचे कॅमेरे बंद वाळूचोर हात साफ करताना दिसत आहे.त्यामुळे वाळूचोर अद्यापही आपला वरचष्मा ठेवून असल्याचे दिसत आहे.त्यातच ऑनलाइन पद्धतीने वाळू मिळण्याची शक्यता दिसत नाही.त्यात वाळूचोर असंबंधीत रेशन कार्ड आणून व आपल्या सोयीने ते जमा करून परस्पर वाळू उपसा करताना दिसत आहे.सामान्य नागरिक मात्र सेतू केंद्रावर चकरा मारताना दिसत आहे.मात्र संबंधित केंद्र चालकांचे हात ओले केले तर वाळू मिळण्यास उशीर होताना दिसत नाही.त्यामुळे नागरिक वैतागताना दिसत आहे.अनेक जण तहसीलदार यांचेकडे तक्रार करताना दिसत असून त्यांना बऱ्यापैकी न्याय मिळताना दिसत असला तरी तेथ पर्यंत सर्वसामान्य नागरिक पोहचताना दिसत नाही त्यामुळे वाळू चोरांची चांदी सुरु असल्याची दिसून येत आहे.


  दरम्यान कोपरगाव तालुक्यातील वाळू उपसा प्रतिबंधक पथक कार्यरत असले तरी त्यांच्या वाट्याला काही काम येताना दिसत नाही मात्र काल मात्र एक अपवादाने एक प्रकरण उघड झाले आहे.त्यात वाळू उपसा प्रतिबंधक पथक धारणगाव येथील गोदावरी नदी काठी गेले असता त्यांना वाळूचोरांनीं हिसका दाखवला आहे.त्यांना धक्का बुक्की करत व शिवीगाळ करत त्यांच्या डोळ्यादेखत आपले वाहन पळवून नेले आहे.त्यांना पाहण्याखेरीज काही करता आले नाही.


   या प्रकरणी फिर्यादी गणेश गरकल यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विकी शिंदे याचे विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा क्रं.४०/२०२४ भा.द.वि.कलम ३५३,३३२,३७९,५११,५०६,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे वाळूचोरांत दहशत पसरली आहे.

  दरम्यान या प्रकरणी पुढील तपास तालुका पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जी.एस.वांढेकर हे करत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close