गुन्हे विषयक
कोपरगावात गोवंश हत्या सुरूच,दोन आरोपींवर गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात अवैध गोवंश कत्तल अद्याप थांबली असल्याचे दिसत नाही असे आढळून आले असून यात शहरातील सुभाषनगर या उपनगरात जानेवारी नंतर पहिल्यांदा नुकतीच अशी घटना उघड झाली आहे.त्यात समध फकिरमहंमद कुरेशी (वय-४५) व मुंतजीर रौफ जुरेशी (वय-२५) दोघे रा.सुभाषनगर यांचे वर शहर पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने गतवेळी सत्तेवर येताच यावर आपला अभिप्राय नोंदवला.या प्रकरणी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दखल घेऊन ०८ वर्षांपूर्वी गोवंश हत्या बंदी कायद्यावर स्वाक्षरी केली होती.त्यानंतर हा कायदा राज्यात लागू करण्यात आला असतानाही कोपरगाव शहरात काही आरोपी वारंवार या बाबत गुन्हे करत असल्याचे वारंवार लक्षात येत आहे.
कोपरगाव शहरात काही कर्तव्यदक्ष गोवंश संरक्षण कार्यकर्ते या बाबत सजग राहून अशा गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी करत आहे तर काही प्रकरणात थेट संबंधित वहाने पकडून देत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहरात पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुभाषनगर या उपनगरात आज दि.२७ जून रोजी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.यात पोलिसांनी आरोपी समध फकिरमहंमद कुरेशी (वय-४५) व मुंतजीर रौफ जुरेशी (वय-२५) दोघे रा.सुभाषनगर आदींनी आपल्या आर्थिक फायद्यासाठी वरील किमतीचे जनावरे विनापरवाना गोवंश जनावरांना त्रास होईल अशा पद्धतीने विनापरवाना कत्तल करण्यासाठी समध कुरेशी याचे घरासमोर आडोशाला बांधून ठेवले असल्याचे निदर्शनास आले आहे.या पूर्वी यातील एका आरोपीच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल झाला होता.मात्र वारंवार तेच गुन्हेगार यात दिसून येत आहे हे विशेष !
सदर आरोपींवर शहर पोलिसांनी नुकताच पहाटे ४.२८ वाजता गुन्हा दाखल केला आहे.यात आरोपीनी निर्दयपणे ५७ हजार रुपये किमतीचे गोवंश जनावरे त्यात ०४ गायी,०७ गोऱ्हे जनावारांचे मांस व ०८ हजार ५०० किमतीचे मांस व कत्तलीसाठी वापरण्यात येणारे हत्यारे आदी जवळपास ६५ हजार ५०० रुपयांचा अवैज जप्त केला आहे.या प्रकरणी फिर्यादी पो.कॉ.ज्ञानेश्वर मधुकर भांगरे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,भरत दाते आदींनी भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.३०४/२०२३ भा.द.वि.कलम ४२९,३४ व महाराष्ट्र प्राणी संरक्षण व सुधारणा अधिनियम २०१५ चे कलम-५(अ)(ब)(क) व ९ व प्राण्यास निर्दयपणे वागवणे कलम ११(१)(ड) प्रमाणे वरील दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.