अर्थ विषयक
भारतीय कामगार कर्मचारी संघ सर्व शक्तीनिशी साकरवाडीच्या कामगारांच्या पाठीशी-आश्वासन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ सर्व शक्तीनिशी साकरवाडीच्या कामगारांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष मिलिंदजी तुळस्कर यांनी कोपरगाव तालुक्यातील साखरवाडी येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील वारी-साकरवाडी येथील सोमैय्या उद्योग समुहाच्या दि.गोदावरी बायोरिफायणरीज लिमिटेड साकरवाडी येथील कामगार संघटनेच्या कामगार सहकारी पतपेढी या संस्थेचा ६७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्या वेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिद्र टेके होते.
जेष्ठ कामगार नेते कै.साथी किशोर पवार हे संस्थेचे संस्थापक असलेल्या या संस्थेच्या गत निवडणुकीत संस्थेत सत्ता बदल करीत अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ या कामगार संघटनेने संस्थेवर वर्चस्व स्थापन करून संस्थेची कर्ज वितरण मर्यादा दोन लाखापर्यंत वाढवली असुन सध्या संस्थेची उलाढाल ४ कोटींची आहे.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष मिलिंदजी तुळस्कर,सरचिटणीस सुहासजी माटे,उपाध्यक्ष प्रशांत वर्तक व विनोद गोगळे हे मुंबईतील आदी कामगार नेते,वारी ग्रामपंचायतीचे उपसरपंच विशाल गोर्डे,सदस्य प्रकाश गोर्डे,अनिल गोरे,राहुल शिंदे,सुवर्णा गजभिव यांचे सह ग्रामस्थ तसेच संघटनेचे अध्यक्ष नारायण वाळुंज,उपाध्यक्ष गौतम मोरे, कामगार सहकारी पतपेढीचे अशोक गजभिव,संचालक महेश वालझडे,शेखनुर शेख, वाहेदखान पठाण,विलास दाभाडे,अनिल निकम,अनिल सिंग,दत्ता शेलार,भगवान हुसळे,मधुकर मोरे,संतोष जगताप,राजपाल रजपूत,अधिकारी बी.पी.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की,”रेल्वे पतपेढीने ४०० कोटींचा टप्प्या आमच्या काळातच पार केल्याचे सांगताना कामगार युनियनमध्ये विविध पदांवर ४० वर्षांहून अधिक काळ आपण कामगार चळवळीत खर्च केला आहे. त्यामुळे न्याय मिळवुन देण्यासाठी माझ्याकडे प्रदीर्घ अनुभव असुन आपली संघटना सर्व शक्तीनिशी साकरवाडीच्या कामगारांच्या पाठीशी उभी असल्याचे सांगत कामगारांच्या प्रश्नात लक्ष घालुन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.
यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांचा तसेच गोदावरी बायोरिफायणरीज लिमिटेड साकरवाडीचे संचालक सुहास गोडगे,सचिन टेके यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे प्रास्तविक कामगार प्रतिनिधी सचिन टेके यांनी केले तर उपस्थितांचे आभार माजी पंचायत समिती सदस्य अशोक कानडे यांनी मानले आहे.