जाहिरात-9423439946
अर्थ विषयक

कोपरगाव तालुक्यातील…या बॅंकेचा नफा जाहीर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या गौतम सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली विक्रमी ३ कोटी १६ लाख रुपयांचा नफा मिळवला असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण पावडे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

“दरम्यान चालू आर्थिक वर्षात गौतम सहकारी बँकेने आपला प्रगतीचा आलेख उंचावत ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात १ कोटी ८८ तरतुदी करून १ कोटी २८ लाख निव्वळ नफा मिळविला आहे.आज मितीस बँकेचे वसुल भाग भांडवल रुपये ५०९.८८ लाख इतके आहे.बँकेच्या ठेवी १०५ कोटी ९३ लाख असून बँकेने ६६ कोटी ३३ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला चालना मिळावी या उद्देशातून शेतकरी,कष्टकरी व सर्व सामान्य नागरिक यांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे यांनी सहकार चळवळ गतीमान करण्यासाठी कारखान्या बरोबरच गौतम सहकारी बँकेची देखील स्थापना केली.बँकेच्या माध्यमातून कामगार,शेतकरी व परिसरातील छोट्या-मोठ्या व्यवसायिकांची आर्थिक अडचण सुटण्यास मोठी मदत झाली आहे.

दरम्यान चालू आर्थिक वर्षात बँकेने आपला प्रगतीचा आलेख उंचावत ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात १ कोटी ८८ तरतुदी करून १ कोटी २८ लाख निव्वळ नफा मिळविला आहे.आज मितीस बँकेचे वसुल भाग भांडवल रुपये ५०९.८८ लाख इतके आहे.बँकेच्या ठेवी १०५ कोटी ९३ लाख असून बँकेने ६६ कोटी ३३ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. गुंतवणूक ५१ कोटी ७८ लाख असून राखीव व इतर निधी १३ कोटी ५० लाख आहे.रिझर्व बँकेच्या मापदंडाप्रमाणे सी.आर.ए.आर.९ टक्के असणे आवश्यक आहे.त्याचे प्रमाण बँकेने २० टक्के राखलेले आहे.बँकेची तरलता मध्ये जादा तरतूद आहे.बँकेची लिक्विडिटी मध्ये अद्याप डिफॉल्ट नाही.बँकेचा सी.डी रेशो ६२.५४ टक्के इतके आहे.बँकेचा नेट एन.पी.ए प्रमाण २.६७ टक्के आहे.थकबाकी प्रमाण ३ टक्के राखले असून बॅकेने अण्णासाहेब पाटील मागास विकास महामंडळाचे माध्यमातून कार्यक्षेत्रातील होतकरू ग्रामीण भागातील उद्योजकांना लघु उद्योग धंद्यास चालना देण्यासाठी सर्वसाधारण रुपये ४० कोटीचे बिनव्याजी कर्ज वितरण केलेले आहे.

यामध्ये बँकेचे माजी संचालक मंडळ व प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड यांचेसह अधिकारी,शाखा प्रमुख व कर्मचारी,सभासद,कर्जदार यांचे मोलाचे योगदान आहे.बँकेच्या प्रगतीबद्दल माजी आ.अशोक काळे व आ.आशुतोष काळे यांनी समाधान व्यक्त करून सर्वांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close