जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

…या तालुक्यातील रस्त्यांच्या कामास मंजुरी !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील  ५० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधींस दिली आहे. 

  “कोपरगाव तालुक्यातील ०९ रस्त्यांचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत समावेश करण्यात आला आहे.त्यामुळे लवकरच या रस्त्यांच्या निधीची तरतूद होवून या रस्त्यांचे नूतनीकरण होणार आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

   यामध्ये पुढील रस्त्यांचा समावेश असून रामा ७ ते कारवाडी रास्ता ग्रा.मा.२७ (३.४७ कि.मी)., संवत्सर,कासली,शिरसगाव रस्ता इजिमा-३ (१०.५० कि.मी.),जळगाव शेळके वस्ती वाकडी ते धनगरवाडी ते दिघी तालुका हद्द रस्ता ग्रा.मा.६५, ग्रा.मा.६७, इजिमा ४६ (८.१४ कि.मी.), न.पा.वाडी ते पुणतांबा रस्ता इजिमा १६ (१.९१ कि.मी.),शिंगवे ते नथु पाटलाची वाडी रस्ता इजिमा.२१७ (६.४६ कि.मी.),वारी ते जिल्हा हद्द रस्ता खोपडी ग्रा.मा.५१ (३.७५ कि.मी.),टाकळी ते ब्राह्मणगाव रस्ता ग्रा.मा.८४ (३.९२ कि.मी.),उक्कडगाव ते तळेगाव मळे रस्ता इजिमा.८ (७.५० कि.मी),तळेगाव मळे ते खोपडी रस्ता इजिमा-२१४ (५.२५ कि.मी.) अशा एकूण ५० किलोमीटरच्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

  या रस्त्यांचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत समावेश करण्यात आला आहे.त्यामुळे लवकरच या रस्त्यांच्या निधीची तरतूद होवून या रस्त्यांचे नूतनीकरण होणार आहे.त्यामुळे नागरिकांचा खराब रस्त्यांचा त्रास कायमचा दूर होण्यास मदत होणार असल्याचे आ.काळे यांनी शेवटी म्हटले आहे. 

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close