आंदोलन
कोपरगावात ‘देऊळ बंद’ची कथा सुरू…?

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि संकटांवर भाष्य आणि ईश्वराच्या अस्तित्वाची परीक्षा पाहणाऱ्या आणि शेवटी स्वामी समर्थांच्या भक्तीकडे वळणाऱ्या एका महिलेचा भावनिक प्रवास दाखवणाऱ्या देऊळ बंद-2 हा चित्रपट वर्तमानात बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालताना दिसत असून या चित्रपटाचा मुख्य हेतू शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालण्यासाठी असला तरी वर्तमानात कोपरगाव शहरात स्वामी समर्थ केंद्राचे ‘देऊळ बंद’ झाले असल्याची धक्कादायक माहिती हाती आली असून याचे नागरिकांनी वर्णन देऊळबंद-3 असे उपहासात्मक केले असल्याने शहरात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.

“कोपरगाव नगरपरिषदेने या वादग्रस्त जागेबाबत कोणताही ठराव केलेला नाही.केवळ एक टिपणा शिवाय काहींही नाही.त्यामुळे सदर जागा ही संबंधित संस्थेकडे कशी गेली याचा बोध होता नाही.नगरपरिषदेने त्यांना पूर्वी दक्षिण बाजूने धार्मिक कार्यासाठी प्रवेशद्वार आणि रस्ता दिला होता.ते प्रवेशद्वार आणि रस्ता जवळपास बंद झाला आहे.त्यांचा पूर्व बाजूस वहिवाट नाही.ती जागा आमची असून आजही 7/12 उतारा आमचे नावावर असल्याने आम्ही सदर जागी आम्ही कुलूप लावले आहे”-बाळासाहेब आढाव,मूळ शेतकरी आणि जमीनमालक कोपरगाव.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”वर्तमानात राज्यात ‘देऊळ बंद २ -आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट गाजत असून चांगला गल्ला जमवत आहे.यात हा चित्रपट शेतकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करतो.या चित्रपटाचे कथानक आणि विषयही कथा एका आस्तिक शेतकऱ्याची नास्तिक पत्नी (संगीता पायगुडे) आणि तिच्या जीवनसंघर्षाभोवती फिरते.शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि संकटांवर भाष्य करणारी ही कथा,ईश्वराच्या अस्तित्वाची परीक्षा पाहणाऱ्या आणि शेवटी स्वामी समर्थांच्या भक्तीकडे वळणाऱ्या एका महिलेचा भावनिक प्रवास दाखवते.या चित्रपटाचा मुख्य हेतू शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालणे हा असून,या चित्रपटाची कमाई शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी देण्यात येणार असल्याची घोषणा दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केली आहे.आत्महत्या केल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नसून,वर्तमान परिस्थितीनुसार शेतीत आणि शेतकऱ्यांत बदल करण्याची गरज आहे,असा संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून दिला गेला आहे.या चित्रपटात स्वामी समर्थ शेतकरी महिलेसोबत शेतात,दऱ्याखोऱ्यांमध्ये,एसटीने प्रवास करत तिचे समुपदेशन करताना दिसत आहेत.तुकाराम (मंगेश देसाई) हा एक गरीब शेतकरी आहे,जो स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त आहे.मात्र परिस्थितीमुळे तो हतबल होतो आणि हताश होऊन ‘देवळाला कुलूप’ लावून निघून जातो.तुकारामची पत्नी संगीता (स्नेहल तरडे) ही अत्यंत खंबीर पण परिस्थितीमुळे नास्तिक बनलेली महिला आहे.आपल्या कुटुंबाला आणि शेतकऱ्यांना होणारा त्रास पाहून ती थेट देवाच्या (स्वामी समर्थांच्या) अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करते.असे या चित्रपटाचे कथानक आहे.वर्तमानात कोपरगावात सुभद्रानगर या उपनगरात एक मराठी आणि खास कोपरगावरुपी ‘ चित्रपट असाच रंग भरू लागला असल्याचे दिसून येत आहे.याची सुरुवात अक्षय तृतीयाच्या दिवशी 19 एप्रिल 2026 रोजी झाली होती.जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आ.आशुतोष काळे यांनी शिफारस करून जवळपास 37 लाख रूपयांच्या निधी त्या ठिकाणी सभागृह व बांधण्यासाठी मंजूर केला असल्याचा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.मात्र हा निधी आम्ही मंजूर केला असून नगरपरिषद आमच्या ताब्यात आहे असा दावा सत्ताधारी आ.कोल्हे गटाने केला असून त्याच्या भूमिपूजनावरून ऐन अक्षय तृतीयाच्या दिवशी शिमगा साजरा झाला होता.त्यात एकास धक्का दिल्याचे दिसून आले होते.त्यामुळे तणावात जाऊन आ.काळे गटाच्या कार्यकर्त्यास रात्रीच्या सुमारास हृदयाचा त्रास होऊन रुग्णालयात उपचारार्थ भरती करावे लागले होते.त्याला जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटला नाही तोच आता पुन्हा एकदा हा विषय मंदिराच्या पूर्व बाजूच्या फाटकास मूळ जमीनधारक आढाव नामक शेतकऱ्यांनी कुलूप लावल्याने ऐरणीवर आला आहे.कारण त्या ठिकाणी 15 एकर क्षेत्रापैकी असलेल्या 56 आर.क्षेत्रात खुला भूखंड पालिकेने राखून ठेवला असून त्या जागी माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांचे सन 2011-12 चे काळात दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्राला खुल्या क्षेत्रापैकी 15 आर.क्षेत्र नगरपरिषदेचा ठराव करून वापरण्यास दिले असल्याचा स्वामी समर्थ सेवेकऱ्यांचा दावा आहे.मात्र आता त्या उर्वरित जागेत आमचा प्लॉट शिल्लक असून त्यावर आमचा हक्क असल्याचा दावा मूळ जमीन मालक बाळासाहेब आढाव यांनी केला आहे.त्यांच्या म्हणण्यानुसार या केंद्राचे प्रवेशद्वार आणि त्या ठिकाणी येण्याजाण्यास रस्ता हे दक्षिणमुखी होते.आणि त्या बाजूने त्यांना जाण्यायेण्यासाठी डॉ.आव्हाड यांचे घरासमोरून प्रवेशद्वार होते.जे आज बंद करून टाकले आहे.त्या जागी असलेल्या रस्त्यावर संबंधित नागरिकांनी अतिक्रमण केले असल्याचा आढाव यांनी आरोप केला आहे.त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे.आणि आम्ही आमच्या मूळ जागीच जागा बंद केली आहे.केंद्रास जाण्यास मज्जाव केलेला नाही.मात्र केंद्राने त्या ठिकाणी अतिक्रमण केले असल्याचा त्यांचा दावा आहे.

दरम्यान याबाबत आमचे प्रतिनिधीने संबंधित स्वामी समर्थ केंद्राचे सुभद्रानगर येथील कार्यरत सेवेकरी यांचेशी संपर्क केला असता त्यांनी आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन काय भूमिका घेत आहे याच्याकडे आमचे लक्ष असल्याची प्रतिक्रिया नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली आहे.
दरम्यान वर्तमानात याच दक्षिण बाजूने सेवेकरी जा ये करत असून तेथील मंदिर बंद झालं असल्याचा अनेकांनी दावा केला असला तरी पूर्णपणे खरा असल्याचे दिसून येत नाही.मात्र वाद निर्माण झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.परिणामी पूर्वमुखी प्रवेशव्दार हे गेल्या चार ते पाच दिवसापासून बंद झाले आहे हे खरे असल्याचे दिसून येत आहे.आता नगरपरिषद प्रशासन काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे आणि भाविकांचे लक्ष लागून राहिले आहे.

“वर्तमानात सरकारच्या वतीने तातडीने व अत्यावश्यक गणली जाणारी जनगणना सुरू असून अधिकारी आणि कर्मचारी त्यात गुंतले आहे.त्यामुळे त्या निर्णयाबाबत उशीर होत आहे.सदर काम धार्मिक असून त्यात दोन्ही बाजूंच्या कागदपत्रांचा अभ्यास करून आम्ही आणि नगरपरिषद नगरविकास विभागाचे अधिकारी योग्य निर्णय तो घेणार आहे”-पराग संधान,अध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
दरम्यान याबाबत नेहमी श्रेयवादासाठी दावा करणारे प्रथापित काळे आणि कोल्हे यांनी सोयिस्कर मौन पाळले असल्याचे दिसून येत आहे.याबाबत आमच्या प्रतिनिधीने नगराध्यक्ष पराग संधान यांचेशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.नंतर त्याचा भ्रमणध्वनी आला असता ते एका ठिकाणी मृत्यू पश्चात दारावर गेले असल्याची माहिती उपलब्ध झाली असून त्यांनी नंतर संपर्क करतो असे सांगितले आहे.तर विरोधी पक्षाच्या नेत्या गौरी मंदार पहाडे यांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे दिसून आले आहे.



