जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
अर्थ विषयकदळणवळण

…या तालुक्यासाठी समाजकल्याण विभागाचा मोठा निधी !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी )
   
   जिल्हा समाजकल्याण विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास २०२४-२५ योजनेअंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध गावातील विकास कामांकरीता ५० लक्ष रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

  

या मंजूर कामामध्ये धारणगाव गावठाण येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे,सुरेगाव रोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे,तसेच निकमनगर येथे रस्ता खडीकरण करणे,वेस-सोयगाव येथील आंबेडकर नगर येथे विज पुरवठा कामे या सह विविध कामे समाविष्ट आहे.

   कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती शासनामार्फत आ.काळे यांनी मोठ्या प्रमाणात निधी मिळविला असल्याचा त्यांच्या प्रसिध्दी कार्यालयाचा दावा आहे.त्या माध्यमातून जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या समाज कल्याण विभागाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी ५० लक्ष रुपयांच्या विकास कामांना प्रशासकिय मंजुरी दिली आहे.

   यामध्ये धारणगाव गावठाण येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे,सुरेगाव रोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे,तसेच निकमनगर येथे रस्ता खडीकरण करणे,वेस-सोयगाव येथील आंबेडकर नगर येथे विज पुरवठा कामे,तसेच भिमनगर येथे बंदिस्त गटार करणे,जेऊर कुंभारी येथील संजयनगर येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे,तसेच पवार वस्ती येथील अंतर्गत रस्ता करणे,रांजणगाव देशमुख गावठाण वरील धाकतोडे वस्ती येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे आदी विकास कामांचा समावेश आहे.

कोपरगाव मतदार संघाच्या विकासकामांना निधी मंजूर केल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे मतदार संघातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close