गुन्हे विषयक
…’त्या’ गुन्ह्यात शस्त्र अधिनियम कलम वाढवले !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील यशवंत चौकात रहिवासी असलेला आपला भाऊ व त्याचे मित्र आइस्क्रीम घेत असताना अण्णाभाऊ साठे चौकात रात्री11.30 वाजेच्या सुमारास,किरकोळ कारणावरून राग येऊन आपल्या पुतण्या विक्रम सागर पवार यास आरोपी हर्षल दत्तात्रय गवारे,आसिफ हसन शेख,सिद्धार्थ सर्जेराव भारती यांनी बेस बॉलच्या दांड्याने व नंतर पिस्तूल उलटा करून त्यास डोक्यावर मारहाण करून जखमी केले होते यात पोलिसांनी तपास करून,’आर्म ॲक्ट’चे कलम वाढवले असल्याची ,माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.

कोपरगाव शहरातील या गुन्ह्यात पिस्तुलाचा वापर करण्यात आला होता.मात्र त्या कलमाचा वापर करण्यात टाळण्यात आला होता.फिर्यादीने याबाबत शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांचेकडे त्याबाबत कलम वाढवणेबाबत लेखी पाठपुरावा करून मागणी केली होती.तिची चौकशी करून शहर पोलिसांनी या गुन्ह्यात आता शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 30 वाढवले असल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,” दि.22 मे च्या रात्री 11.30 वाजता लोकशाहीर अण्णासाहेब साठे पुतळ्याजवळ यातील फिर्यादी राहुल पवार याचा भाऊ विक्रम पवार हा व त्याचा मित्र हे त्या ठिकाणी उभे असताना भरकादेवी आईस क्रीम मधून आईस क्रीम खाण्यास घेत असताना त्या ठिकाणी आपल्या ताब्यातील चारचाकी वाहन हर्षल गवारे हा जोरात चालवत येऊन त्याने सदरची गाडी जखमी विक्रम पवार याचे जवळ उभी केली होती.त्यावेळी जखमी विक्रम पवार व त्याचा सहकारी यांनी त्यास,” अरे,हर्षल गाडी हळू चालव,मुलांना गाडीचा धक्का लागेल” असे म्हटल्याचा राग आला होता.त्याला ते समजावून सांगत असताना त्याने आपली गाडी थांबवून गाडीतील बेस बॉल चा दांडा बाहेर काढून जखमी तरुण विक्रम पवार यास मारहाण सुरू केली होती.त्याला त्याचे अन्य सहकारी सिद्धार्थ भारती आणि आसिफ शेख यांनीही मदत केली आहे.शेवटी तर त्याने आपल्या ताब्यातील पिस्तूल काढून त्याच्या उलट्या दांड्याने त्याच्या डोक्यात जोराचा प्रहार केल्याने त्याचे डोके फुटून तो गंभीर जखमी झाला आहे.ही माहिती स्वप्नील बाळू पवार यास समजली असतान त्याने त्याची कशीबशी सुटका केली होती.त्याला डोक्यात मोठी गंभीर दुखापत झाली असल्याचे दिसून आले होते,त्याला संत जनार्दन स्वामी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते.

दरम्यान या बाबत शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा नोंदणी क्रं.-165/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118 (1),352,351(2),(3)(5) अन्वये आरोपी हर्षल गवारे याचेवर गुन्हा दाखल केला होता.मात्र यात पिस्तुलाचा वापर करण्यात आला होता.मात्र त्या कलमाचा वापर करण्यात टाळण्यात आला होता.फिर्यादीने याबाबत शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांचेकडे त्याबाबत कलम वाढवणेबाबत लेखी पाठपुरावा करून मागणी केली होती.तिची चौकशी करून शहर पोलिसांनी या गुन्ह्यात आता शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 30 वाढवले असल्याची माहिती मिळाली आहे.याबाबत फिर्यादीनी समाधान व्यक्त केले आहे.पुढील तपास कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिपक रोठे हे करीत आहेत.



