गुन्हे विषयक
…या तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठी चोरी,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे हद्दीत नुकतीच वारी शिवारात अपार कंपनीची सोलारची प्लॅन्टची अंदाजे 06 हजार मीटर तांब्याची 90 हजार रुपये किमतीची वायर अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याचा गुन्हा वारी येथील विसिंग इंद्रासिंग बोहरा (वय-32) इलेक्ट्रिक अभियंता यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.

कोपरगाव तालुक्यातील वारी ग्रामपंचायत हद्दीत शेत गट क्रमांक 203/4 मध्ये घडली आहे.तेथे एक सोलर प्लॅन्ट असून त्यासाठी मोठी तांब्याची वायर वापरण्यात आली होती.त्यातील सुमारे 06 हजार मीटर वायर अज्ञात चोरट्याने कोणी नाही अशी वेळ शोधत येथील इलेक्ट्रिक अभियंत्याच्या संमती शिवाय चोरून नेली आहे.
कोपरगाव शहर आणि तालुक्यात चोऱ्यांच्या संख्या वाढताना दिसून येत आहे.अधूनमधून चोरटे पोलिस अधिकारी जेरबंद करताना दिसून येत आहे.मात्र चोऱ्या काही थांबायचे नाव घेत नाही अशीच एक घटना नुकतीच वारी ग्रामपंचायत हद्दीत शेत गट क्रमांक 203/4 मध्ये घडली आहे.तेथे एक सोलर प्लॅन्ट असून त्यासाठी मोठी तांब्याची वायर वापरण्यात आली होती.त्यातील सुमारे 06 हजार मीटर वायर अज्ञात चोरट्याने कोणी नाही अशी वेळ शोधत येथील इलेक्ट्रिक अभियंत्याच्या संमती शिवाय चोरून नेली आहे.ही घटना दिनाक 27 मे दुपारी 12.30 ते 29 में दुपारी 12.30 या दरम्यान घडली आहे.त्यांनी याप्रकरणी गुन्हा घडल्याचे लक्षात आल्यावर तातडीने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गुन्हा क्रमांक 238/2026 भारतीय न्याय संहिता कायदा 2023 चे कलम 303(2) प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल आर. ओ.कारखेले हे करीत आहे.



