अर्थ विषयक
कोपरगाव नागरी सहकारी बँक कर्मचारी पतसंस्थेस…इतक्या लाखांचा नफा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील दि.कोपरगाव पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड व गौतम सहकारी बँक लिमिटेड यांचे कर्मचारी वर्गाची सभासद असलेल्या कोपरगाव तालुका नागरी सहकारी बँक कर्मचारी पतसंस्थेस नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात रुपये आठ लाख अकरा हजार रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब सर्जेराव जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
“कोपरगाव तालुका नागरी सहकारी बँक कर्मचारी पतसंस्थेचे भाग भांडवल रुपये ५५.१४ लाख,निधी रुपये ३१.५६ लाख,गुंतवणूक रुपये २६.५१लाख व सभासदांना कर्ज वाटप रुपये ८४.४३ लाख असून ग्रॉस एन.पी.ए.शून्य टक्के आहे”-बाळासाहेब जाधव,अध्यक्ष,कोपरगाव तालुका नागरी सहकारी बँक कर्मचारी पतसंस्था,कोपरगाव.
संस्थेच्या प्रगतीमध्ये सातत्याने वाढ होत असून सभासदांना आर्थिक गरजा भागविण्याकरिता कमीत कमी व्याजदरामध्ये तत्पर वित्तपुरवठा संस्थेमार्फत केला जातो तसेच वाटप झालेल्या कर्जाची शंभर टक्के नियमित वसुली असून संस्थेचा ग्रॉस एनपीए व थकबाकी 0% राखण्यात यावर्षीही यश प्राप्त झाले आहे अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र बाळासाहेब सुपेकर यांनी दिली आहे.सभासदांना मागील वर्षांमध्ये बारा टक्के लाभांश देण्यात आला असून,सतत ऑडीट वर्ग “अ” प्राप्त आहे.
संस्थेचे यशामध्ये संस्थेचे संचालक बबनराव भागवत,विरेश पैठणकर,गोकुळ गंगवाल,महेंद्र ऊगले,सुधाकर नरोडे,विश्वनाथ धुळे,शैला लावर,सुचेता कदम व सचिव जितेंद्र छाजेड,प्रदीप मेढे यांचा मोठा वाटा आहे.संस्थेच्या यशस्वी वाटचालीस पिपल्स बँकेचे महाव्यवस्थापक दिपक एकबोटे व गौतम बँकेचे महाव्यवस्थापक श्री घेमुड साहेब यांचे मार्गदर्शन लाभत असून त्यांचेही आभार व्यक्त करण्यात आले.