गुन्हे विषयक
गोमांस विक्रीत भाजप पदाधिकाऱ्यांचा भाऊ सामील ?

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात गोवंश हत्या हा कायम चिंतेचा विषय राहिलेला आहे.त्यामुळे पोलिस आणि नगरपरिषद प्रशासन वैतागले असताना आज नगरपरिषद प्रशासनाने कठोर निर्णय घेत पोलिस प्रशासनाला साथीला घेत आज संजयनगर परिसरात मोठी कारवाई करत त्या ठिकाणचे अतिक्रमणावर निर्दयपणे हातोडा चालवला असल्याचे दिसून आले असताना त्या गुन्ह्यात कमी येण्याऐवजी वाढ होते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.कारण या घटनेनंतर पुन्हा दोनच दिवसांनी आयेशा कॉलनीतील आरोपी वसीम अक्रम कुरेशी (वय -35) याने पुन्हा एकदा गुन्हा केला असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.शिवाय सदर आरोपी भाजपच्या एका माजी उपनराध्यक्षांचा भाऊ असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि त्यांचे नेतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असल्याचे दिसून आले आहे.

कोपरगावचे उपनगर असलेल्या संजयनगर मधील आयेशा कॉलनीत गोमांस संबंधित अतिक्रमण पाडून टाकले होते.त्यानंतर या गुन्ह्यात कमी येईल ही सामान्य नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनेची अपेक्षा फोल ठरली आहे.कारण दोनच दिवसात पुन्हा एकदा 28 मे रोजी रात्री 10 वाजता अशी आणखी एक कारवाई पोलिसांना करावी लागली असल्याचे उघड झाले आहे.विशेष म्हणजे त्यात एक ईशान्यगड भाजपच्या माजी उपनगराध्यक्ष असलेल्या कार्यकर्त्यांचा भाऊच सामील असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.त्यामुळे या घटनेची मुख्यमंत्री फडणवीस समर्थक आ.विवेक कोल्हे कशी दखल घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोपरगाव शहरात गोवंश हत्या बंद करावी अशी मागणी सातत्याने हिंदुत्ववादी संघटना करत आहेत.मात्र भाजप सत्तेत असतानाही पोलिस त्याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून आले आहे.त्याबाबत नुकतीच एक कारवाई कॉन्स्टेबल यमनाजी सुबे यांनी केली होती.त्यात आरोपी शफीक शरीफ कुरेशी व शाहीद शेख या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.यातील आरोपी शफीक सय्यद हा फरार झाला होता.त्यात 40 हजार किमतीचे गोवंश जप्त करण्यात आले होते.ही कारवाई पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिपक रोठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राबवली होती.दरम्यान गोवंश हत्या बंद होण्याचे नाव घेत नाही म्हणून भाजपा सरकारने दिनाक 21 मे 2026 रोजी एक नवा अध्यादेश काढून याबाबत पोलिसांना सक्त कारवाईचे आदेश दिले होते.त्यात त्यांनी,”प्रचलित असलेले कायदे व आणि नियम यांचा भंग करून वारंवार संघटित पद्धतीने गो तस्करी करणाऱ्या व्यक्ती टोळ्या अथवा संघटनाविरुद्ध संबंधित पोलिस यंत्रणांनी तपास करून मोक्का अंतर्गत कारवाई करावी असे आदेश दिले आहे.त्यासाठी सरकारने या गोवंश हत्येस प्रतिबंध होण्यासाठी 112 क्रमांकाची प्रसिद्धी करून या हेल्पलाईंनवर नागरिकांनी संपर्क करावा असे आवाहन केले आहे.त्यानंतर प्रशासन जागे झाले होते.या शिवाय हिंदुत्ववादी संघटना,बजरंग दल,गोसेवक आदींनी तातडीने दोन दिवसापूर्वी एक बैठक शहर पोलिस ठाण्यात आयोजित करून या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती.त्यानंतर नगरपरिषद आणि पोलिसांनी याबाबत संबंधिताना नोटिसा बजावल्या होत्या.व कारवाई होणार हे नक्की झाले होते.आज त्याची प्रचिती आली असून 26 मे रोजी सकाळी 10 वाजता कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप आणि शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी रामकृष्ण कुंभार आणि यांच्या सहकाऱ्यांनी मोठी कारवाई केली होती.यात संजयनगर आयेशा कॉलनीत संबंधित अतिक्रमण पाडून टाकले होते.त्यानंतर या गुन्ह्यात कमी येईल ही सामान्य नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनेची अपेक्षा फोल ठरली आहे.कारण दोनच दिवसात पुन्हा एकदा 28 मे रोजी रात्री 10 वाजता अशी आणखी एक कारवाई पोलिसांना करावी लागली असल्याचे उघड झाले आहे.विशेष म्हणजे त्यात एक ईशान्यगड भाजपच्या माजी उपनगराध्यक्ष असलेल्या कार्यकर्त्यांचा भाऊच सामील असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे फिर्यादी पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर मधुकर भांगरे (वय-37) यांनी आरोपी वसीम अक्रम कुरेशी याचे विरुद्ध गुन्हा दखल केला आहे.त्यात त्यांनी म्हटले आहे की,”आरोपीने 03 हजार किमतीचे 15 किलो वजनाचे गोमांस जातीचे मांस विक्री करताना मिळून आला आहे.ते त्यांनी जप्त केले आहे.जप्त पुढील तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉन्स्टेबल पी.डी.सोनवणे हे करत आहेत.



