अर्थ विषयक
लोहगाव शाखेच्या शाखाधिकारी पदी बुचुडे यांची नियुक्ति

जनशक्ती न्यूजसेवा
लोहगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील अहमदनगर जिल्हा बँकेच्या प्रवरानगर शाखेच्या शाखाधिकारी पदी सचिन शिवाजी बुचूडे यांची निवड झाल्याबद्दल लोहगाव सोसायटीच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र केरूनाथ चेचरे यांनी सचिन बुचुडे यांचा शाल व श्रीफळ देऊन नुकताच सत्कार केला आहे.
यावेळी बोलताना सचिन बुचुडे म्हणाले की आपण २०११ मध्ये जिल्हा बँकेत सेवेत रुजू झालो माझी पहिली नेमणूक संगमनेर तालुक्यातील निमज येथे झाली होती.त्यानंतर मी राहाता तालुक्यातील लोणी व आता प्रवरानगर शाखेत धनपाल या पदावर कार्यरत आहे.परंतु संस्थेने मला प्रवरानगर शाखा अधिकारी पदी नियुक्ती केली आहे.
यावेळी लोहगाव व तिसगाव सोसायटीचे सचिव आर.व्ही.चेचरे,कृष्णा चेचरे,पत्रकार विजय बोडखे,कोडीराम नेहे आदी मान्यवर उपस्थित होते.