जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांचा भ्रमनिरास-या आमदारांचा आरोप

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाकडून सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना (पी.एम.किसान) योजनेंतर्गत मागील वर्षापासून प्रत्येकी २ हजार रुपये मदत दिली जात होती. मात्र केंद्र शासनाने अनेक शेतकऱ्यांच्या खात्यातून ऐन दिवाळीच्यावेळी हि रक्कम परस्पर काढून घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये म्हटले आहे.

पंतप्रधान किसान सन्मान योजना देशभरात लागू करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत गेली दोन वर्षे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा निधी चार महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जातात.या पार्श्वभूमीवर आ.काळे यांनी हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले आहे.त्यात हि टीका केली आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून काही शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे.तरीही अशा व्यक्तींना गेली दोन वर्षे या योजनेत समाविष्ट करून लाभ दिला जात असल्याची प्रकरणे उजेडात आली आहेत.सातबारा उताऱ्यावरील नावाचा वापर करून पैसे लाटणाऱ्या अशा ५४४ बनावट लाभार्थ्यांना पैसे परत करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे.केंद्र सरकारने १ डिसेंबर २०१८ पासून केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान योजना देशभरात लागू करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत गेली दोन वर्षे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा निधी चार महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जातात.या पार्श्वभूमीवर आ.काळे यांनी हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीस दिले आहे.त्यात हि टीका केली आहे.

या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मदत करतांना सर्व कागदपत्रांची पडताळणी करूनच शेतकऱ्यांना मदत देण्यात आली असल्याचा दावा या प्रसिद्धी पत्रकात केला आहे.हि मदत मिळविण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भार सोसावा लागला असून आर्थिक भार सोसून देखील आलेली मदतीची रक्कम केंद्र शासनाने परत घेतली आहे.त्या मुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याची केंद्र शासनाची भूमिका संशयास्पद वाटत असल्याचा आरोप आ.काळे त्यांनी केला आहे. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वतीने आपण गाऱ्हाणे मांडणार आहे.शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत सोसाव्या लागणाऱ्या अडचणीबाबत शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव असलेले जाणते राजे शरद पवार यातून नक्कीच मार्ग काढतील असा आशावाद आ.काळे यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close