संपादकीय
कोपरगावात पो.नि.मानगावकरानंतर कोण अधिकारी येणार ?
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे नुकतीच नगर येथें कोतवाली पोलीस ठाण्यात बदली झालेले पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी कोपरगाव शहरात कायदा सुव्यवस्था कठोरपणे राबवून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेला न्याय देणाऱ्या अधिकऱ्यांची बदली झाल्याने आता नवीन अधिकारी कोण येणार या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पोलीस निरीक्षक मानगावकर कोपरगावात येण्याआधी शहर हद्दीत मोठ्या प्रमाणावर महिलांचे दागिने ओरबाडण्याचे काम इंदिरापथ,साई सिटी,राम मंदिर रोड,धारणगाव रोड आदी ठिकाणी सर्रास होत असे.मात्र मानगावकर यांची नियुक्ती झाल्यानंतर मात्र त्यावर त्यांनी सक्तीची गस्त स्वतः घातली पण पोलीस अधिकारी व कनिष्ठ कर्मचारी यांनाही सक्तीने ते करण्यास भाग पाडले हे विसरता येणार नाही.
महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताकातील तिसरे सर्वात मोठे राज्य असून महाराष्ट्रातील पोलीस दल देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलातील एक आहे.महाराष्ट्र हे औद्योगिकरणामध्ये प्रगत राज्य असून त्यामध्ये अनेक शहरी व्यावसायिक आणि व्यापारी संस्था आहेत.महाराष्ट्रातील मोठ्या शहरात पोलिसांच्या कामकाजासाठी आयुक्तालय पध्दतीचा स्विकार करण्यात आला आहे.राज्यात ११ आयुक्तालये आणि ३६ जिल्हा पोलीस घटक आहेत.‘‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’’ हे महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य आहे.याचा अर्थ असा की,महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबध्द आहेत.मात्र पोलीस राजकीय नेत्यांचे हस्तक बनले की त्यांचा विदूषक होण्यास वेळ लागत नाही.कोपरगावात मात्र पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर हे मानगावकर म्हणूनच राहिले हे त्यांचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य ठरले आहे.नगरमध्ये काही वर्षांपूर्वी पोलीस अधीक्षक कार्यालयावर राजकीय गुंडांनी केलेला हल्ला हा पोलीस आणि राजकीय नेत्यांच्या विदूषकी चाळ्यांचा उत्तम नमुना होता असे गुन्हेगारात धाडस केंव्हा येते तर पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे साटेलोटे असल्यावरच येते हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
पोलीस हा राज्सरकारचा कर्मचारी असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी त्यास सोपविलेली आहे.आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचेही त्यास अधिकार आहेत.पोलीसामुळे आपण सुरक्षित आहोत.परंतु त्यांचे जिवन खूपच असुरक्षित आहे.पोलीस हे कर्तव्य निष्ठ असतात.जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नूतन पोलीस अधीक्षकांनी बदल्या केल्या आहेत त्यात नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात नुकतीच पो.नि.राकेश मानगावकर यांची आकस्मितरित्या बदली झाली आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात आता नवीन पोलीस अधिकारी कोण येणार ? याकडे राजकीय व सामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहणे हि बाब उत्कंठावर्धक मानली जात आहे.
पोलीस निरीक्षक मानगावकर यांनी कुठल्याही राजकिय दबावाला न जुमानता शहरातील नागरिक,विशेषतः भगिनींना सुरक्षित वाटेल असे काम केले याबाबत कोणाचेही दुमत होणार नाही.बावीस मार्च रोजी पहिली जनता टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर शासनाने दुसरी टाळेबंदी २४ मार्च रोजी जाहीर केली व त्यानंतर नागरिक कोरोनाच्या साथीने भयभीत झाले होते.अशा वेळी कोरोना नियंत्रणात आणण्याचे प्रशासनापुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते.अशा परिस्थितीत तालुका प्रशासनास सर्वाधिक मदत झाली ती पोलीस प्रशासनाची.त्यात मोलाची भूमिका निभावली ती पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी.कोरोना काळात जनतेने मुखपट्ट्या वापराव्यात यासाठी त्यांनी कठोर धोरण अवलंबले होते.येवला,औरंगाबाद,मालेगाव,नगर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत असताना कोपरगावात मात्र हा आकडा नियंत्रणात ठेवण्याच्या प्रयत्नांत त्यांचे नाव आघाडीवर होते.त्यामुळे मुखपट्टी विना फिरणारा नागरिक त्या वेळी अवघड होते.त्या नंतर कधीच वास्तवात न येणारा “एक गाव एक गणपती” उपक्रम यशस्वी केला.गांधीनगर,सुभाषनगर आदी ठिकाणी येवला नाका आदी ठिकाणी असामाजीक तत्वांचा उच्छाद कोपरगावकरांना नवीन नाही.चार-दोन दिवसात नंग्या तलवारी घेऊन दौडणारा व अभद्र झुंडशाहीचे प्रदर्शन करणारे टोळके हि तर नित्याचीच बाब होती.त्या अपप्रवृत्तीस त्यांनी चांगलाच चाप लावला होता.या गुंडगिरीचा एखादा तरी नमुना उघड होणार व नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊनच फिरावे लागत होते.महिलांना व महाविद्यालयीन विद्यार्थिनींना याचा सर्वाधिक फटका बसत होता.येवला नाका याठिकाणी मुलींची छेड काढणारे टोळके ही कायमची डोकेदुखी होती.ती मानगावकर यांच्या धाकाने आपोआप निकाली निघाली होती.पोलीस निरीक्षक मानगावकर कोपरगावात येण्याआधी शहर हद्दीत मोठ्या प्रमाणावर महिलांचे दागिने ओरबाडण्याचे काम इंदिरापथ,साई सिटी,राम मंदिर रोड,धारणगाव रोड आदी ठिकाणी सर्रास होत असे.मात्र मानगावकर यांची नियुक्ती झाल्यानंतर मात्र त्यावर त्यांनी सक्तीची गस्त स्वतः घातली पण पोलीस अधिकारी व कनिष्ठ कर्मचारी यांनाही सक्तीने ते करण्यास भाग पाडले हे विसरता येणार नाही.व हा दिनक्रम केवळ दिखाव्यासाठी नव्हता हे विशेष ! त्यात त्यांनी अखेरपर्यंत सातत्य ठेवले होतें.बऱ्याच वेळा पोलीस कर्मचारी खाजगीत हा त्रागाही व्यक्त केल्याचे आमच्या प्रतिनिधीने अनुभवले आहे हे वेगळे सांगणे न लगे.मात्र त्याचा परिणाम मात्र नक्कीच चांगला होता.तीच बाब मुंबई-नागपूर या महामार्गावर व पुणतांबा चौफुली ते झगडे फाटा या मार्गावर सातत्याने वहान चालकांची होणारी लूट हि बाब नित्याचीच ठरली होती.त्याला त्यांनी चांगलाच चाप लावला होता.पोलीस निरीक्षक मानगावकर त्या बाबतीत फारच दक्ष अधिकारी म्हणून त्यांचे नाव कायम कोपरगावकर नागरिक स्मरणात ठेवतील यात शंका नाही.काही राजकीय नेत्यांची अडचण झाली ! नाही असे नाही.मात्र त्यांचे अधिकाऱ्यांना कायम फोन हे याला आत घाला आणि याला बाहेर काढा या धर्तीचे असत.व आपला राजकीय सूड विरोधी कार्यकर्त्यांवर उगविंण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा वापर हे त्यांचे हत्यार ठरलेले असे.हि काही नव्याने सांगण्याची गरज नाही हि बाब शहरातील नागरिकांच्या तोंडपाठ आहे.त्यांना राजकीय हस्तक्षेप खपत नसे हे त्यांनी कधी लपूनही ठेवले नाही.गणेशोत्सवात एक नगरसेवक झिंगत पोलीस ठाण्यात एक तक्रार मिटविण्यासाठी गेला असता त्यांनी त्याला कसे चोपून काढले हे नव्याने सांगण्याची गरज नाही.त्यानंतर कोणाही राजकीय कार्यकर्त्याने नेतेगिरी करण्याचा व त्यांच्या समोर कॉलरला हात लावून जाण्याचे धारिष्टय केले नाही.(अशा कार्यकर्त्याना हे राजकीय नेते कसे बढती देतात व राजकीय नेत्यांची निवड कशी आहे व कोपरगाव शहरास कसे राजकीय भवितव्य आहे हा याचा उत्तम नमुना म्हटला पाहिजे) पोलीस आणि महसूल हा विभाग भ्रष्टाचार मुक्त असा दावा कोणीही करणार नाही.व तो या लेखाचा विषय नाही.मात्र त्यातल्या त्यात दगडापेक्षा वीट निवडण्याचा हा काळ असल्याने त्याच मोजमापाने हि तुलना होणें कधीही संयुक्तिक मानावी हे उत्तम.मात्र मागील सर्व अधिकांऱ्यांची कारकीर्द बघितली तर त्यात पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,आणि यांची कारकीर्द नक्कीच दखलपात्र ठरते.त्यात मानगावकर यांनी शहर पोलीस ठाण्याच्या डोक्यावर शिरपेच ठेवला हे नक्की.नगर-मनमाड रोडवर काही दिवसापूर्वी धोत्रे येथील परप्रांतातून माल घेऊन कोपरगावात आलेला व सकाळीच भल्या पहाटेच तो ट्रक लुटला गेला त्याचे आरोपी त्यांनी चोवीस तासाच्या आत पकडले होते.त्यामुळे त्यांच्या वाटेला जाण्याचे धारिष्ट्य फार कोणी केल्याचे ऐकिवात नाही.पोलीस निरीक्षक मानगावकर यांनी गुन्हेगारी नियंत्रणात आणली,सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवले होते.त्यामुळे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आली होती.खिसेकापू,दागिने ओरबडणाऱ्या टोळ्यांना धाक निर्माण झाला होता.व त्यामुळे गुन्हेगारीचा आलेख किमान पातळीवर स्थिरावला होता.ही बाब अनेक वर्षात घडून एक पोलीस अधिकारी काय करू शकतो याचे आदर्श उदाहरण निर्माण झाले होते.त्यामुळे आगामी काळात कोपरंगावकरांच्या स्मरणात पोलीस निरीक्षक मांगावकर हे कायम स्मरणात रहातील हे नक्की.