आरोग्य
कोपरगाव गटविकास अधिकाऱ्यांचा सपत्नीक आदर्श

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतात यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला असून यात कोपरगाव पंचायत समितीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते त्यात गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी पत्नी अंजली सूर्यवंशी यांचेसह रक्तदान केले आहे.सुर्यवंशी यांनी नवव्यांदा तर पत्नी अंजली यांनी दुसऱ्यांदा रक्तदान केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांपुढे या जोडप्याने नवा आदर्श घालून दिला असल्याचे मानले जात आहे.
भारतात यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला आहे.पंधरा ऑगस्ट यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत.देशभरात स्वातंत्र्य दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला आहे.कोपरगाव शहरासह तालुक्यात देशभरात विविध देशभक्तिपर उपक्रम आणि अभियान राबवण्यात येत आहेत.कोपरगाव येथील ग्रामीण विकासात अग्रणी असलेल्या कोपरगाव पंचायत समितीत हा उत्साह पाहायला मिळायला आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पंचायत समितीच्या वतीने अनेक विधायक उपक्रम राबविण्यात आले.अमृत पंधरवाडा तसेच स्वराज्य महोत्सव या उपक्रमांची सांगता नुकतीच पंचायत समिती येथे आयोजित रक्तदान शिबिराने झाली आहे.या रक्तदान शिबिरात पंचायत समितीच्या विविध विभागांचे अधिकारी,कर्मचारी,सरपंच,ग्रामसेवक,ग्रामपंचायत कर्मचारी,रोजगार सेवक,संगणक परिचालक,महाविद्यालयीन युवक,शिक्षक तसेच अनेक नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला आहे.त्यात गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी व अंजली सूर्यवंशी या जोडप्यासह सर्व अधिकारी,कर्मचारी आदींनीं हे रक्तदान केले आहे.त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या रक्तदान शिबिरात एकूण १२८ दात्यांनी रक्तदान केले.यामध्ये तीन महिलांनी देखील रक्तदान केले.रक्त संकलनाची जबाबदारी संजीवनी ब्लड बँक कोपरगाव यांनी यशस्वी पणे पार पाडली आहे.अमृत महोत्सवी वर्षात कोपरगाव पंचायत समितीने झिरो पेंडन्सी,अभिलेख व्यवस्थापन,वृक्ष लागवड,ग्रंथालय उभारणी तसेच रक्तदान शिबिर यासारख्या महत्त्वाच्या उपक्रमांचे आयोजन केले होते.
अमृत महोत्सवी वर्षात सुरू केलेले हे सर्वच उपक्रम आगामी काळात देखील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शाश्वत ठेवणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी तथा प्रशासक सचिन सूर्यवंशी यांनी दिली आहे.
रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी गटविकास अधिकारी श्री सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब साबळे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास घोलप, उपअभियंता चांगदेव लाटे,विस्तार अधिकारी बबन वाघमोडे,प्रशांत तोरवणे,प्रशासन अधिकारी संतोष नलगे,सहाय्यक लेखाधिकारी गणेश सोनवणे,तालुका समन्वयक नितीन मोरे,सचिन बोरुडे यांनी प्रयत्न केले.ग्रामविकास अधिकारी गोरक्षनाथ शेळके,राज बागले आणि सुनील राजपूत यांनी विशेष सहकार्य केले.