कोपरगाव तालुका
कोपरगावात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव न्यायालयात तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत योगाभ्यास करत आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

२१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्याने आणि सूर्याचं दक्षिणायन सुरु होण्याचा हा काळ असल्यानं या संक्रमण काळात योगाचा जास्त फायदा पोहोचतो म्हणून २१ जूनची निवड या दिवसासाठी करण्यात आली असून कोपरगावसह जगभर तो मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
२०१४ साली ११ डिसेंबरला संयुक्त राष्ट्र संघानं योगाचं महत्व मान्य करत २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती.२१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्याने आणि सूर्याचं दक्षिणायन सुरु होण्याचा हा काळ असल्यानं या संक्रमण काळात योगाचा जास्त फायदा पोहोचतो म्हणून २१ जूनची निवड या दिवसासाठी करण्यात आली असून कोपरगावसह जगभर तो मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
कोपरगांव न्यायालयाचे पटांगणात जिल्हा न्यायाधीश सयाजीराव को-हाळे,दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) शौकत देसाई,सहदिवाणी न्यायाधीश स्वरुप बोस,सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) महेश शिलार,सहदिवाणी न्यायाधीश भगवान पंडित,दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) स्मिता बनसोड यांचे सह न्यायालयीन कर्मचारी,वकील यांनी स्वतः योगासने प्राणायाम,ध्यान करत योगादिवस साजरा केला आहे.
कोपरगाव तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती व कोपरगाव वकील संघ कोपरगाव यांचे संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन कोपरगाव न्यायालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते.प्रसिद्ध योगशिक्षक संतोष नलगे यांनी योगासन,प्राणायाम,ध्यान या संदर्भात शास्त्रोक्त माहिती सांगितली तर राष्ट्रीय योग शिक्षक महेश थोरात,भावना नलगे यांनी योगासनांची प्रात्यक्षिक सादर केले.
पद्मासन,भुजंगासन,शलभासन,त्रिकोणासन,पर्वतासन,वृक्षासन,पच्छिमोत्तानासन यासह अनेक श्वसनाच्या अभ्यास,प्राणायाम पूर्व तयारी यासह योगा संदर्भात शास्त्रोक्त माहिती देवून त्याचे निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी फायदे सांगितले.
आंतरराष्ट्रीय योग दिनी जिल्हा सरकारी वकील ॲड.अशोक वहाडणे,ॲड.अशोक टुपके,वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.जयंत जोशी,सचिव ॲड.अनुप ठोळे,कार्यालयीन अधीक्षक सुनील निसाळ,परमजित मंटाला,तालुका विधी सेवा समितीचे सागर नगरकर यांचे सह न्यायालयीन अधिकारी आणि कर्मचारी,वकील बहुसंख्येने उपस्थित होते.आंतरराष्ट्रीय योग दिनी योग शिक्षकांकडून मिळालेल्या शास्त्रोक्त माहिती आणि प्रात्यक्षिकाने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले आहे.



