कृषी विभाग
वर्ग-२ जमीन धारकांना आनंदाची बातमी,शेतकरी संघटनेच्या लढ्याला यश

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्रीरामपूर तालुक्यातील वर्ग दोन च्या जमिनी धारकांसाठी शेती कर्ज मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी संदर्भात शेतकरी संघटनेने जिल्हा बँक येथे गेल्या आठ दिवसापूर्वी अधिकाऱ्यांबरोबर सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या अडचणी संदर्भात पाठपुरावा करून वर्ग दोनची जमीन धारकांवर कर्ज मिळवण्यातील अडचणी दूर झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
वर्ग दोनची जमीन धारकांना कर्जपुरवठा करत असताना जामीनदाराची सक्ती केली होती त्या जाचक अटींतून मार्ग काढण्यासाठी शेतकरी संघटनेने पाठपुरावा केला होता.बँकेचे अधिकारी व बँकेचे अध्यक्ष यांच्या बरोबर सदर विषयावर सविस्तर चर्चा करून नाबार्डचे शेतीविषयक धोरण केंद्र शासनाचे किसान क्रेडिट कार्ड संदर्भात राज्य शासनाची व केंद्र शासनाच्या असलेल्या योजनांची पूर्ण माहिती सदर अधिकाऱ्यांपुढे सादर केल्यानंतर या विषयावर संचालक मंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन नुकतेच दिले आहे.
वर्ग दोनच्या शेतकऱ्यांना सदर जमिनी केवळ भोगवटदार म्हणून वापरता येत होत्या मात्र त्यांना कर्ज,तारण देण्यात अडचणी येत होत्या.त्यामुळे या जमिनी ताब्यात असूनही अडचण होती.त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी सावकारीचा विळखा पडत होता.
त्या अडचणी निर्माण होत होत्या त्या दूर करण्यासाठी तसेच वर्ग दोनची जमीन धारकांना कर्जपुरवठा करत असताना जामीनदाराची सक्ती केली होती त्या जाचक अटींतून मार्ग काढण्यासाठी शेतकरी संघटनेने पाठपुरावा केला होता.बँकेचे अधिकारी व बँकेचे अध्यक्ष यांच्या बरोबर सदर विषयावर सविस्तर चर्चा करून नाबार्डचे शेतीविषयक धोरण केंद्र शासनाचे किसान क्रेडिट कार्ड संदर्भात राज्य शासनाची व केंद्र शासनाच्या असलेल्या योजनांची पूर्ण माहिती सदर अधिकाऱ्यांपुढे सादर केल्यानंतर या विषयावर संचालक मंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन नुकतेच दिले आहे.
दि.१९ ऑगष्ट रोजी संचालक मंडळाची बैठक होऊन सदर बैठकीमध्ये वर्ग दोन जमीन धारकांना कर्जपुरवठा करताना कोणत्याही प्रकारच्या जामीनदार देण्याची गरज नाही अशा स्वरूपाचा निर्णय जिल्हा बँकेने घेतला असल्याकारणाने आता सर्व वर्ग-२ जमीन धारकांसाठी कर्ज मिळणे सुलभ होणार आहे.
सदर विषयांमध्ये सातत्याने पाठपुरावा करून औरंगाबाद उच्च न्यायालय वकील संघाचे माजी अध्यक्ष व शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अजित काळे,जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,तालुका अध्यक्ष युवराज जगताप शिवाजी जवरे,हरिभाऊ तुवर,डॉ.दादासाहेब आदिक,डॉ.नवले इंद्रभान चोरमल,नारायण टेकाळे,अशोक टेकाळे,अभिजित बोर्डे,भास्कर तुवर,कडू पवार,साहेबराव चोरमल,दादा पवार,बाळासाहेब बडाख,सुदाम औताडे,भागचंद औताडे,अकबर शेख,ईश्वर दरंदले, फकीरचंद चोरमल,अभिजित बोर्डे,दिलीप औताडे,मनोज औताडे,पांडू राऊत व इतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केल्यामुळे सदरचा विषय तडीस गेला आहे.
त्यामुळे सर्व शेतकरी या निर्णयामुळे आनंदित झाले आहेत.त्यांनी शेतकरी संघटनेचे आभार आणि अभिनंदन केले आहे.जिल्हाबँकेच्या शेती कर्ज वाटपाबाबदच्या धोरणामध्ये आणखी काही त्रुटी असून याबाबतही पाठपुरावा करणार असलेचे ऍड.अजित काळे व अनिल औताडे यांनी म्हटले आहे.
श्रीरामपूर तालुक्यात जिल्ह्यत सर्वाधिक क्षेत्र हे खंडकरी शेतकऱ्याचे असल्यामुळे तालुक्यातील या शेतकरी खातेदाराबरोबरच इतरही वर्ग दोन च्या खातेदारासाठीही शेती कर्जासाठीचा जिल्हा बँकेत कर्ज घेण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.