जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

डॉक्टरांना कोरोना झाला अफवांनी तालुका संभ्रमात- डॉक्टरांना मनस्ताप

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

श्रीरामपूर-(प्रतिनिधी)

कोरोनाच्या लढाईसाठी व त्याला हरवून त्यावर विजय प्राप्त करण्यासाठी शासन स्तरावरून युद्ध पातळीवर विविध प्रयत्न सुरू आहे.मात्र श्रीरामपूर तालुक्यातील काही महाभागांनी काही डॉक्टरांनाच कोरोना झाल्याची खोट्या अफवा उठवून संबंधित डॉक्टरांसह तालुक्यातील सर्व जनतेला संभ्रमात टाकले आहे.

कोरोनाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य दुसऱ्या टप्प्यात मध्ये आहे. कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या टप्प्यात मध्ये न जाता दुसऱ्याच टप्यातच त्यावर विजय प्राप्त करण्यासाठी शासनासह,आरोग्य खाते,महसूल विभाग,पोलीस विभाग, नगरपालिका व सर्व ग्रामपंचायतीसह सुजान नागरिक व विविध सामाजिक संस्था प्रयत्न करीत आहेत.कोरोना इतक्याच गंभीत अफवांनी सध्या प्रशासनाला हैराण केले आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवून भीती निर्माण करणाऱ्यांवर कारवाईही सुरू झाली आहे. म्हणून की काय श्रीरामपूरात गुरुवारी सायंकाळी काही डॉक्टरानाच कोरोनाची लागण झाल्याची तोंडी अफवा पसरवून खळबळ निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला.त्यामुळे या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केलेल्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.ही अफवा एवढ्यावरच थांबली नाही तर या अफवेने थेट या डॉक्टरांना पोहचवले सुध्दा. ही अफवा जसजशी पसरू लागली त्यावर नागरिकांनी पत्रकारांना फोन करून ही माहिती दिली. याबाबत खात्री केली असता हे डॉक्टर आपल्या रुग्णालयात नियमितपणे रुग्णांवर उपचार करीत असल्याचे समोर आले.एवढेच नाही तर सायंकाळी आमदार लहू कानडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीलाही हजर होते.

दरम्यान याबाबत डॉ.निशिकांत चव्हाण व डॉ.संजय अनारसे यांचेशी चर्चा केली असता त्यांनी या अफवेबाबत दुजोरा देत मनस्ताप व्यक्त केला. असे झाले तर भीतीपोटी रुग्ण दवाखान्यातच येणार नाही.असे झाले तर इतरही आजार वाढतील.सध्याच्या परिस्थितीत आपला दवाखाना बंद न ठेवता डॉक्टर स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करीत आहेत.त्यांना नैतिक मानसिक पाठबळ देण्या ऐवजी अशा अफवा पसरवून त्यांना थेट स्मशानापर्यंत पोहचवण्याचा असुरी आनंद चीड आणणारा आहे.अशा महाभागांचा शोध घेऊन त्यांचेवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close