जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव पहिल्यांदाच ठप्प,नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज कोपरगाव शहर आणि तालुक्यात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे जनता बंद मध्ये सहभाग नोंदवून आपले कर्तव्य निभावले असले तरी काही असामाजिक तत्त्वांनी डोके बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पोलीस प्रशासनाने सरळ केल्याने शहरात सर्वत्र स्मशान शांतता आढळून आली आहे.आ. आशुतोष काळे,कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे व कोपरंगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी जनतेने केलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जमावबंदी जाहीर केल्याने जनतेत काळजीचा सूर उमटला आहे.मात्र जनतेच्या हिताचा असून जनतेसमोर अन्य पर्याय नसल्याने जनतेने त्याचे स्वागत केले आहे.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती त्याचे छायाचित्र

दरम्यान बसस्थानकात असलेल्या महिलेला व तिच्या अल्पवयीन मुलाला तहसील प्रशासनाने जेवणाची व्यवस्था करून दिली असल्याचे आमच्या निदर्शनात आले आहे.काही सामाजिक संस्थांनी सामाजिक जाणीव दाखवत “सामाजिक संकेत स्थळावर” ज्यांची जेवणाची व्यवस्था नसेल त्यांना जेवणाची व्यवस्था करू असे संकेत टाकून त्याखाली दूरध्वनी क्रमांक दिल्याचे आढळून आले आहे.त्याबद्दल अनेकांनी कौतुक केले आहे.

गांधी चौक परिसरातील शांतता सोबत दिसत आहे.

राज्यात कोरोनाचा दुसरा टप्पा सुरु झाला असून देशात ३२४ तर राज्यात ७५ रुग्ण वाढले आहेत तर राज्यात दोन मृत्यू झाल्याने राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.या कालखंडात देशात रुग्ण वाढण्याचा धोका असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते त्याला देशभरातून खुप चांगला प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही.नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर व तालुक्यात नागरिकांनी जोरदार स्वागत केले आहे.सकाळी सात वाजे पासून या बंदची अंमलबजावणी सुरु करण्यात आली. प्रारंभी तरुणांनी त्याकडे काहीसे दुर्लक्ष केल्याचे आढळल्याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आपला हिसका दाखवल्यावर ते ठिकाणावर आल्याचे आढळले मग दिवसभर या शक्तींचा उपद्रव जाणवला नाही.त्यामुळे नेहमी गजबजलेला असलेला परिसर म्हणून महात्मा गांधी चौक,बस स्थानक परिसर,अण्णाभाऊ साठे चौक,साईबाबा चौक,छत्रपती संभाजी महाराज चौक,अहिंसा स्तंभ, न्यायालय परिसर,तहसीलदार कचेरी,खडकी नाका, गांधीनगर,एस.जी. शाळा,येवला नाका, कोपरगाव बाजार समिती परिसर,कोपरगाव रेल्वे स्थानक आदी ठिकाणी एकदम सन्नाटा आढळून आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील नागरिकांनी आपली सर्व दुकाने बंद ठेवली त्याचे छायाचित्र

दरम्यान जनतेसाठी अत्यावश्यक सेवेचे कर्तव्य बजावणाऱ्या प्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी पंतप्रधानांनी सायंकाळी पाचच्या टाळ्या,घंटा,किंवा थाळ्या वाजविण्याचे आवाहन केले होते त्याला बरोबर पाच वाजता नागरिकांनी प्रतीसाद दिला आहे.नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आपल्या कुटुंब कबिल्यासह यात सहभाग नोंदवला आहे.

दरम्यान दुबई येथून आपल्या कुंभारी या गावी आलेल्या एका तरुणांची माहिती तालुका प्रशासनास मिळाल्यावर त्यांना ताबडतोब ताब्यात घेऊन त्यांची रवानगी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे करण्यात आली होती त्याचा तपासणी अहवाल आला असून तो नकारात्मक आला असल्याची माहिती कोपरगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्वास टाकला आहे.

आमच्या प्रतिनिधीने दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शहराचा फेरफटका मारला असता कोपरगाव बस स्थानकाच्या शेडमध्ये एक तिशीतील सोनाली संतोष साळवे नावाची एक महिला आपल्या नऊ वर्षाच्या मुलांसह आढळून आली त्यावेळी तिची विचारणा केली असता तिने आपण औरंगाबाद येथील असून कोपरगाव पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीच्या कामास गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणून काम करत असून आपल्याला येथे घर नसल्याची सबब सांगितली.त्यावर आमच्या प्रतिनिधीने कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे होऊ शकत नसल्याचे सांगून आपले आपत्कालीन कर्मचारी पाठवून त्या महिलेच्या नातेवाईकांचा शोध सुरु केला आहे.दरम्यान शहरात टिळकनगर,गांधीनगर,परिसरात काही तरुण गल्लीत डोकावून पाहताना आढळले तथापि आमच्या प्रतिनिधींची गाडी पाहिली असता त्यांनी पोलिसांची गाडी समजून धूम ठोकल्याने दिसून आले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close