जाहिरात-9423439946
संपादक-नानासाहेब जवरे
श्रीरामपूर-(प्रतिनिधी)
उगाचच घाबरून फिलिपाईन्स मधून भारतात येण्यासाठी प्रवास करण्यापेक्षा आहे तेथेच थांबणे योग्य समजले.घरचे नातेवाईक काळजीत आहेत मात्र उगाचच पॅनिक होऊन चुकीचे निर्णय घेणे अयोग्य असल्याने आम्ही सर्वांनी येथेच राहणे पसंद केले आहे.कोरोना रोगाला घाबरण्यापेक्षा भारतीयांनी शासनाच्या आवाहनानुसार अनावश्यक गर्दी टाळून लोकांनी घरातच राहून कोरोना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन फिलिपाईन्स मधील दवावो येथून डॉ निर्भय नवनाथ कुताळ यांनी केले आहे.
फिलिपाईन्स मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला असून तेथील सरकारने संशयित रुग्ण आढळताच तेथे लॉक डाऊन जाहीर केले आहे.तेथील नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला असून कोणीही घराच्या बाहेर पडत नाही त्यामुळे आपण ज्या शहरात आहोत तेथे त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहते आहे.
श्रीरामपूर नजीक असलेल्या बेलापूर येथील पत्रकार नवनाथ कुताळ यांचा मुलगा निर्भय हा फिलिपाईन्स मधील दवावो येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्याच्यासोबत अजून काही भारतीय विद्यार्थीही आहेत.तेथेही कोरोनाचा शिरकाव झाला असून तेथील सरकारने संशयित रुग्ण आढळताच तेथे लॉक डाऊन जाहीर केले आहे.तेथील नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला असून कोणीही घराच्या बाहेर पडत नाही त्यामुळे आपण ज्या शहरात आहोत तेथे त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहते आहे.सर्वजण भारतात येताहेत आपण येणार का याबाबत विचारले असता उगाचच घाबरून प्रवास करण्यापेक्षा आहे तेथेच थांबणे योग्य आहे.घरचे नातेवाईक काळजीत आहेत मात्र उगाचच पॅनिक होऊन चुकीचे निर्णय घेणे अयोग्य असल्याने आम्ही सर्वांनी येथेच राहणे पसंद केले आहे.महाराष्ट्र राज्यातील संख्या पाहता सर्व नागरिकांनी शासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.