आरोग्य
कोपरगाव तालुक्यात एकाचे निधन,तर लसी अभावी नागरिकांची हेळसांड,
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दरम्यान कोपरगाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात मृत्युदर वाढला असून कोरोनाचे रुग्ण हि मोठ्या प्रमाणात वाढले असतानाही बाधित नागरिकांना तपासणीसाठी आवश्यक साहित्याचा मोठा अभाव दिसून येत आहे.याबाबत आता शहरात नगरसेवकांनी पुढाकार घेऊन वर्गणी क करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र आभाळच फाटल्यावर त्यांच्या ठिगळाला (प्रयत्नाला) मर्यादा येणार हि बाब उघड आहे.शहरात नगरपरिषदेला आता स्मशानभूमी कमी पडायला लागली असल्याने त्याचे विस्तारीकरण करण्याची तयारी करावी लागत आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख ६७ हजार १९९ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या २३ हजार १२४ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख ४२ हजार १२४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार ९५० रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.कोपरगाव तालुक्यात २७ दिवसात ७१ जण दगावले आहे.तर शेकडो जण बाधित झाले आहे.मात्र कोरोना तपासणीसाठी आवश्यक संच उपलब्ध नसल्याने तालुक्यातील बाधित रुग्णांची सर्व वाऱ्यावरील वरात असल्याचे दिसून येत आहे.कोरोनावर मात करण्यासाठी कोविड लस हा एकमात्र पर्याय दिसत असल्याने त्याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेआत.मात्र मागणी आणि पुरवठा याबाबत मोठी तफावत असल्याने याचा ताळमेळ लावण्यास उशीर होणार हे उघड आहे.तो पर्यंत नागरिकांना आपला जीव मुठीत धरून राहावे लागणार आहे.