जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
उद्योग

संवत्सर येथील सूक्ष्म उद्योगाला वाढता प्रतिसाद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)


   कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील उद्योजक रवींद्र पंडित वाघ यांनी “आर आर प्रीमियम अगरबत्ती” या नावाने सुरू केलेल्या अगरबत्ती उद्योगाला परिसरातील नागरिकांकडून लक्षवेधी प्रतिसाद मिळत आहे.फॅब्रिकेशन व्यवसायात कार्यरत असलेल्या रवींद्र वाघ यांनी स्वतःची जागा व उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करून हा नवीन उद्योग सुरू केला आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

   सूक्ष्म उद्योगांना चालना देण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाकडून पंतप्रधान मुद्रा योजना,पीएमएफएमई योजना,आणि सीजीटीएमएसई यांसारख्या विविध पत हमी आणि अनुदानाच्या योजना राबविल्या जातात.या योजनांचा मुख्य उद्देश उद्योजकांना विनातारण कर्ज आणि आर्थिक सबसिडी देणे हा आहे.

  

   सूक्ष्म उद्योगांना चालना देण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाकडून पंतप्रधान मुद्रा योजना,पीएमएफएमई योजना,आणि सीजीटीएमएसई यांसारख्या विविध पत हमी आणि अनुदानाच्या योजना राबविल्या जातात.या योजनांचा मुख्य उद्देश उद्योजकांना विनातारण कर्ज आणि आर्थिक सबसिडी देणे हा आहे,त्याचा फायदा ग्रामीण भागात होताना दिसून येत आहे.संवत्सर येथेही रवींद्र वाघ यांनी यात उत्साह दाखवून अनेकांना प्रेरणा निर्माण करून दिली आहे.

संवत्सर येथील रवींद्र वाघ यांनी स्वतःची जागा व उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करून हा नवीन उद्योग सुरू केला आहे.

   वर्तमानात त्यांच्या उद्योगामध्ये गुलाब,मोगरा,लवेंडर,पायनापल यांसह १२ विविध सुगंधांमध्ये अगरबत्ती उपलब्ध असून होलसेल व रिटेल विक्री सुरू आहे.कमी कालावधीत गुणवत्तेमुळे ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यात त्यांना यश आले आहे.या उद्योगाला भेट देऊन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष व भाजपा दिव्यांग सेल कोपरगाव तालुका अध्यक्ष मुकुंद काळे,दिनेश बोरनारे व छायाताई काळे यांनी शाल,श्रीफल व पुष्पहार देऊन सत्कार केला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

   या नव्या उद्योग उपक्रमाबद्दल कोपरगाव संजीवनी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र परजणे,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब शेटे,ग्रामपंचायत सदस्य महेश परजणे,रामभाऊ कासार,संभाजी बोरनारे,भाजपा सचिव संदीप मैंद,सचिन शेटे,राजेंद्र आबा बोरनारे,दिलीप कासार व मोहन निकम आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close