आरोग्य
कोपरगाव प्रदर्शन मधील कोरोना केंद्रामुळे कोरोनाग्रस्तांना दिलासा !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेवून आ.आशुतोष काळे यांनी पुढाकार घेवून महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे ५०० बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरु केल्यामुळे असंख्य कोरोना बाधित रुग्णांना दिलासा मिळाला असून उपचारासाठी दाखल झालेले बांधित रुग्णांना मोफत उपचाराबरोबरच योगसाधनेचे धडे देवून रोज शेकडो रुग्ण उपचार घेवून आपल्या घरी जात आहे.
कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण वाढल्याच्या व मृत्युदर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आता तालुक्यातील राजकीय दृष्ट्या बलवान नेते सजग झाल्याचे दिसत आहे.व त्यांनी नागरिकांनी सामाजिक स्थळावर नेटकऱ्यांनी या नेत्यांचे कान उपटण्यास प्रारंभ केल्यावर त्यांची गाडी “देर आये दुरुस्त आये”असे म्हटले जात आहे.त्यात आधी बाजी मारली ते आ.आशुतोष काळे यांनी.
राज्यात कोरोनाचे नवनवे उच्चान्क स्थापन होत असताना कोपरगाव तालुकाही त्यात कमी नाही कोपरगावात आता टाळेबंदी जाहीर झाल्यापासून रुग्णसंख्या निम्म्याने कमी झाली असली तरी मात्र मृत्यू दर मात्र विलक्षणरित्या वाढला आहे.हि बाब काळजी वाढविणारी ठरली असून या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने तालुक्यातील रुग्णालयांची व त्यात सामावून घेणाऱ्या रुग्णांची स्थिती नुकतीच समजून घेतली असता धक्कादायक माहिती हाती आली होती.त्यात खाजगी व सरकारी असे एकूण सहा रुग्णालयाने असून त्यांची एकूण खाटांची संख्या ३६५ आहे.तर प्राणवायू पुरविण्यास सक्षम खाटा २४३ आहे.त्यात अतिदक्षता (आय.सी.यू) विभागाच्या केवळ १५ खाटा उपलब्ध आहे.यात एकूण भरती रुग्ण संख्या ३१४ आहे.तर प्रस्तावित रुग्णसंख्या अजून ७५ ने वाढू शकत असल्याची माहिती उपलब्ध झाली होती.त्यामुळे आगामी काळात जीव वाचविणे किती कर्मकठीण बाब असल्याचे उघड झाले होते या पार्श्वभूमीवर आता तालुक्यातील राजकीय दृष्ट्या बलवान नेते सजग झाल्याचे दिसत आहे.व त्यांनी नागरिकांनी सामाजिक स्थळावर नेटकऱ्यांनी या नेत्यांचे कान उपटण्यास प्रारंभ केल्यावर त्यांची गाडी “देर आये दुरुस्त आये”असे म्हटले जात आहे.त्यात आधी बाजी मारली ते आ.आशुतोष काळे यांनी.
त्यांनी वेळीच पाऊल उचलून ५०० बेडचे जम्बो कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.मागील वर्षी एस.एस.जी.एम.महाविद्यालयाच्या वसतीगृहात २०० बेडचे कोविड केअर सेंटर सुरु केल्यामुळे बाधित रुग्णांना येत असलेली अडचण दूर करून ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे ३० ऑक्सिजन बेडचे डेडीकेटेड सेंटर सुरु केले ह होते. मात्र यावर्षी आलेल्या दुसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणात नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्यामुळे एस.एस.जी.एम.महाविद्यालयाच्या वसतीगृहात १०० ऑक्सिजन बेडचे कोविड केअर सेंटर येत्या एक दोन दिवसात कार्यान्वित होणार आहे.जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना मोफत उपचार दिले जात आहे.ज्या रुग्णांना तात्पुरत्या स्वरुपात ऑक्सिजनची आवश्यकता आहे अशा रुग्णांना प्राथमिक स्वरुपात ऑक्सिजन देखील उपलब्ध करून दिला जात आहे.उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांना रोज सकाळी नाश्ता सकाळ संध्याकाळ दोन वेळेस चहा व रुचकर जेवण दिले जात असून सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.जम्बो कोविड केअर सेंटर शेजारीच श्री साईबाबा तपोभूमी आहे.
सध्या या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये महिला व पुरुष स्वतंत्र उपचार घेत आहेत.दररोज शेकडो रुग्ण बाधित आढळून येत आहेत.रुग्णवाढ थांबण्याचे चिन्ह दिसत नसल्यामुळे येत्या काही दिवसात जरी बाधित रुग्णांची संख्या वाढली तरी आ. काळे यांनी १०० बेडची तयारी करून ठेवली आहे.त्यामुळे दुसऱ्या लाटेची दाहकता जरी जास्त असली तरी १०० ऑक्सिजन बेडचे सुरु होणारे कोविड केअर सेंटर व करण्यात आलेली पूर्वतयारी पाहता सर्वसामान्य बाधित नागरिकांना या माध्यमातून मोठा दिलासा मिळण्यास मदत मिळणार आहे.