निधन वार्ता
ज्ञानेश्वर मापारी यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पढेगांव येथील शिक्षक ज्ञानेश्वर बबनराव मापारी (वय-३६) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात आई वडील,पत्नी,एक मुलगा,दोन भाऊ असा परिवार आहे.
स्व.ज्ञानेश्वर मापारी हे शिवसेना तालुका उपप्रमुख बाळासाहेब मापारी व परसराम मापारी यांचे धाकटे बंधु होते.त्यांच्या अकस्मात निधनामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असुन,शनिवार दि.२४ रोजी दुपारी १वाजता शोकाकुल वातावरणात पढेगांव वैकुंठभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.