जाहिरात-9423439946
आरोग्य

कोरोना संचाची कमतरता पडू देऊ नका-पालक मंत्र्यांकडे आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात आढळून येत असलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येमुळे आरोग्य विभागाला जास्तीत जास्त चाचण्या करण्याचे आदेश देण्यात आले असून त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी तपासणी संचाची कमतरता पडू देवू नका असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांना केले आहे.

कोपरगाव तालुक्यात व शहरात कोरोनाचा मृत्युदर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.या पार्श्वभूमीवर आ.काळे यांनी शुक्रवार दि.२३ एप्रिल रोजी पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांची मुंबई येथे त्यांच्या कार्यालयात भेट घेतली त्यावेळी हे आवाहन केले आहे.

कोपरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडत आहे.उपचारासाठी कोरोना रुग्णांना आता खाटा कमी पडत असून प्राणवायू व रेमडीसीविर आदी औषधांचा साठा कमी पडत आहे.कोरोनाचा मृत्युदर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.या पार्श्वभूमीवर आ.काळे यांनी शुक्रवार दि.२३ एप्रिल रोजी पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांची मुंबई येथे त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.कोरोना बाधित रुग्णांची रोजची आकडेवारी पाहता कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत.कोपरगाव तालुक्यात देखील मागील एक महिन्यापासून कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून दररोज करण्यात येत असलेल्या तपासणीतून शेकडो रुग्णांची भर बाधित रुग्णाच्या संख्येत पडत आहेत.त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची तपासणी करावी लागणार असून तालुक्यातील प्रत्येक गावात जावून बाधित रुग्णाच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेवून तपासणी करावी लागणार आहे.आढळून येत असलेल्या बाधित रुग्णाच्या संख्येचा विचार करता यापुढे मोठ्या प्रमाणात तपासणी संचाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे बाधित रुग्णाच्या संपर्कातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून प्रत्येक व्यक्तीची तपासणी करावी लागणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात या संचाची आवश्यकता भासणार असून आवश्यक असणारा या संचाचा पुरवठा कोपरगाव तालुक्यासाठी करण्यात यावा असे आवाहनही आ.काळे यांनी पालकमंत्री ना. मुश्रीफ यांना शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close