आरोग्य
नागरिकांनी मुखपट्या वापराव्या अन्यथा कारवाई करणार-पो.नि.जाधव
जनशक्ती न्यूसजेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी सार्वजनिक ठिकाणी व इतरत्र वावरणाऱ्या नागरिकांनीं मुखपट्या वापरणे आवश्यक असून याबाबत नागरिकांनी हयगय केली तर त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईल असा इशारा कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी नुकताच एका कार्यक्रमात बोलताना दिला आहे.
कोपरगाव शहर पुन्हा एकदा उचांकी रुग्णवाढ होत आहे.आज आलेल्या अहवालात सहा नागरिकांचा बळी गेला आहे.तर १४६ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.तर आतापर्यंत ५८ नागरिकांचा बळी गेला आहे.या पार्श्वभूमीवर कडक कारवाई करणे गरजेचे बनले आहे.या बाबत प्रशासनाला रुग्ण वाढीला आळा घालण्यात अपयश येत असून शहर व तालुका टाळेबंदीकडे वेगाने वाटचाल करीत या पार्श्वभूमीवर तालुका पोलिसानी हि मोहिम सुरु केली आहे.
कोपरगाव शहर पुन्हा एकदा उचांकी रुग्णवाढ होत आहे.आज आलेल्या अहवालात सहा नागरिकांचा बळी गेला आहे.तर १४६ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.तर आतापर्यंत ५८ नागरिकांचा बळी गेला आहे.या पार्श्वभूमीवर कडक कारवाई करणे गरजेचे बनले आहे.या बाबत प्रशासनाला रुग्ण वाढीला आळा घालण्यात अपयश येत असून शहर व तालुका टाळेबंदीकडे वेगाने वाटचाल करीत असल्याने आता पोलीस बेशिस्त नागरिकांचा बंदोबस्त करण्यास रस्त्यावर उतरले आहे.त्याला कोपरगाव तालुका पोलिसही अपवाद नाही.या पार्श्वभूमीवर त्यांनी जनगजागृती सुरु केली आहे.व त्यांनी सार्वजनिक खरेदी विक्री केंद्रावर मुखपट्ट्या वापरणे संदर्भात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.तशा आशयाचे जनजागृती भित्ती पत्रक तयार केले आहे.त्याचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी स्वच्छता दूत सुशांत घोडके,पोलिस हवालदार प्रदिप काशिद,राजेंद्र म्हस्के,पोलीस काॅन्स्टेबल जयदिप गवारे,अंबादास वाघ,गोपनीय शाखेचे युवाराज खुळे यांचे सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
कोरोना नियंत्रण मोहिमेचा एक भाग म्हणून अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे,उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे हद्दीत मुखपट्या न वापरणे तसेच कोरोना नियंत्रणासाठी शासनाचे नियम न पाळणारे यांचेवर दंडात्मक कारवाई सुरु आहे.या सोबत जनजागृतीचे भित्ती पत्रक कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे हद्दीतील आस्थापना,सार्वजनिक खरेदी विक्री केंद्रावर तसेच इतरही सार्वजनिक केंद्रावर चिकटले जात आहे.या भीत्तीपत्रकात कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना सुचवल्या आहेत.कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे हस्ते “मुखपट्या वापरा” जनजागृती पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.
कोरोना नियंत्रणासाठी मुखपट्ट्या सर्व नागरिकांनी वापरणे बंधनकारक आहे.नाक व तोंड पुर्ण झाकले जाईल अशा पध्दतीने मास्क वापरावे.तसेच लस घेतलेले,कोरोना संसर्ग पुर्ण बरा झालेल्या सर्वांनी मास्क वापरणे बंधनकारक असल्याने जाधव यांनी शेवटी सांगितले आहे.कोरोना नियंत्रणासाठी सर्वांनी सहभागी होवून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे