गुन्हे विषयक
अल्पवयीन मुलीचा विनयभंग,कोपरगावात आरोपी बापा विरुद्ध गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत हद्दीतील इयत्ता आठवीत शिकणारी अल्पवयीन मुलगी राहत्या घरात झोपलेली असताना आरोपी बाप याने तिला झोपेतून उठवून पाय दाबून देण्याच्या बहाण्याने जवळ झोपून विनयभंग केल्याची फिर्याद दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.त्यामुळे या अल्पवयीन मुलींसाठी आभाळच फाटले आहे.
कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील हा अल्पवयीन नराधम बाप व त्याच्या पत्नीचे भांडण सुरु असून त्यामुळे मुलीची आई औरंगाबाद येथे राहते व हि अल्पवयीन मुले बापाकडे राहतात.त्या संधीचा फायदा उपटून या निर्लज्ज बापाने हे कृत्य केले आहे.याबाबत या बाधित मुलीने पोष्टाचा वापर करून हि दुर्दवी घटना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यास कळवली असल्याने हा प्रकार उघड झाला आहे.
करंजी येथील हा अल्पवयीन नराधम बाप व त्याच्या पत्नीचे भांडण सुरु असून त्यामुळे मुलीची आई औरंगाबाद येथे राहते व हि अल्पवयीन मुले बापाकडे राहतात.त्या संधीचा फायदा उपटून या निर्लज्ज बापाने हे कृत्य केले आहे.याबाबत या बाधित मुलीने पोष्टाचा वापर करून हि दुर्दवी घटना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यास कळवली असल्याने हा प्रकार उघड झाला आहे.पोलिसानी त्याबाबत आज या अल्पवयीन मुलीची फिर्याद आज दाखल करून घेतली आहे. कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात या पित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.या नराधमाचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे.
आरोपीने आपल्याच अल्पवयीन मुलीवर वाईट नजर टाकून तिच्यासोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करत फिर्यादी अल्पवयीन मुलीस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व “जर तू आरडा ओरडा केला व कोणास काही एक सांगितले तर तुला जीवे मारून टाकील”अशी धमकी दिली आहे.
वरील फिर्यादी वरून कोपरगाव तालुका पोलिसांनी या नराधम बापाविरुद्ध गुन्हा र.क्रं.१०२/२०२१ भा.द.वी. कलम ३५४,५०६ सह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे.या घटनेचा पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक दौलतराव जाधव हे करीत आहे.दरम्यान हि मुले आता या बापाकडून आईकडे देण्याचा निर्णय पोलिसानी घेतला असल्याचे समजते.