आरोग्य
गोयंका ग्रुपतर्फे संस्थानला ५.१० लाखांची औषधी

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालय आणि कोरोना विलगीकरण केंद्राकरीता गोयंका ग्रुप,शांती एंटरप्रायसेस, मुंबई यांनी ०५ लाख १० हजार १४४ रुपये किंमतीचे अत्यावश्यक औषधे देणगी स्वरुपात दिले आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.सदरची देणगी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्याकडे गोयंका ग्रुपच्या वतीने नाना गुरव यांनी सुपूर्त केली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.बगाटे यांनी श्री.गुरव यांचा सत्कार केला.
या प्रसंगी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे,वैद्यकीय संचालक डॉ.विजय नरोडे, वैद्यकीय अधिक्षिका डॉ.मैथिली पितांबरे,स्टोअर मॅनेजर दिलीप शर्मा,रुग्णालयाचे प्र.जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके,खरेदी व्यवस्थापक कुणाल आभाळे आदी मान्यवर उपस्थित होते.