जाहिरात-9423439946
अर्थ विषयक

..या पतसंस्थेच्या येवला शाखेच्या ठेवी ५० कोटींवर

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव-सभासद व ग्राहकांचे हित जोपासणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य समता नागरी सहकारी पतसंस्थेने ३१ मे २००१ रोजी येवला शहरात शाखा सुरु करून गेल्या १९ वर्षापासून ग्राहकांना प्रामाणिकपणे सेवा देत १२ ऑक्टोंबर २०२० रोजी ५० कोटींचा टप्पा गाठला असून ११ कोटी ६६ लाख सोनेतारण कर्ज वाटप झाल्याची माहिती समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे व अरविंद पटेल यांनी दिली आहे.

समता पतसंस्थेला नेहमीच प्रेमाची व मैत्रीची भावना असून येवल्यातील पैठणी उद्योग देशात नावाजलेला असून येवला शहराला उज्ज्वल भवितव्य आहे.येवला शहरात राष्ट्रीयकृत बँका आहेत, पण येवल्यातील पतसंस्थांना महत्व प्राप्त करून देण्याचे महत्वाचे काम पतसंस्था चळवळ करीत आहे. पतसंस्थांमध्ये गुंतविलेला पैसा स्थानिक व्यापार वृद्धीसाठी तसेच स्थानिक रोजगार निर्मितीसाठी वापरला जातो-संदीप कोयटे,संचालक समता पतसंस्था.

ते पुढे म्हणाले कि ‘नासिक जिल्ह्यातील येवला तालुका पैठणी उद्योगासाठी प्रसिद्ध असून त्या भागातील शेतकरी तसेच छोटे-मोठे उद्योग या विचारातून शाखेची सुरुवात करून २००१ मध्ये २ कोटी त्यानंतर पुढील ५ वर्षात म्हणजे २००६ साली ठेवी ११ कोटी रुपयांपर्यंत गेल्या. त्यापुढील ५ वर्षात २०११ साली २३ कोटी ठेवी पूर्ण केल्या.त्यानंतरच्या ५ वर्षात २०१६ साली ३६ कोटी पर्यंत गेल्या तर १२ ऑक्टोबर २०२० रोजी ५० कोटींच्या ठेवींचा टप्पा पार करत एकूण ५२ कोटी ठेवी पूर्ण झाल्या आहे.’

या प्रसंगी बोलतांना संदीप कोयटे म्हणाले कि,’समता पतसंस्थेच्या ठेवी लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंडाच्या आधारे कशी सुरक्षित आहे.याचे आकडेवारीसह सादरीकरण ५०,७५४ ठेवीदारांतील ४८,७३९ एवढ्या ठेवीदारांच्या प्रत्येकी ५.५० लाख रुपयांच्या ठेवींना लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंडाचे संरक्षण प्राप्त असल्याचे सांगितले आहे.म्हणजेच एकूण ठेवीदारांपैकी ९६ टक्के ठेवीदारांच्या ठेवी १०० टक्के सुरक्षित आहे. समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रत्येक शाखेत अत्याधुनिक तंत्र प्रणाली,पेपरलेस,व्हौचरलेस तसेच कॅशलेस बँकिंग कामकाज करत असून समता रिकव्हरी पॅटर्न आणि ऑडीट कंट्रोल रूम संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. समताने गेले ६ महीन्यांपासून सोने तारण कर्ज वाटपावर भर दिला असून विशेषतः ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना कमीत कमी व्याज दराने सोने तारण कर्ज मिळाले पाहिजे या उद्देशाने संस्थेने सोनेतारण कर्ज वाटपाच्या विवीध योजना जाहीर केलेल्या आहे. सोने तारणकर्ज घेणाऱ्यांनी खाजगी वित्तीय संस्थांकडून फसव्या व्याजदराने सोने तारण कर्ज घेण्याऐवजी सहकारी पतसंस्थेकडून सोनेतारण कर्जाचा व्यवहार करावा.किरकोळ दुकानदारांसाठी ठोक व्यापाऱ्यांकडून रोखीने व कमी व्याजदरात कर्ज घेण्यासाठी शुअर सेल शुअर पेमेंट योजना अंमलात आणली. या योजनेस चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळत असून या योजनांचा फायदा किरकोळ व ठोक व्यापाऱ्यांनी घ्यावा,येवला शहर व ग्रामीण भागाविषयी समता परिवाराला आस्था आहे.मात्र राष्ट्रीयकृत बँकांमधील पैसा हा महानगरी मधल्या भांडवलदारांसाठी वापरला जातो.हा फरक लक्षात घेऊन स्थानिक पतसंस्थांमध्येच आपले व्यवहार करण्याचे आवाहन केले.

येवला शाखेच्या ठेवी ५० कोटींच्या पुढे गेल्या असून संस्थेसह शाखेची जबाबदारी देखील अधिक वाढली आहे. त्यामुळे समताच्या ब्रीदवाक्याप्रमाणे सभासदांनी समतावर विश्वास ठेवत ठेवी ठेवल्या, त्यांच्या ठेवींना सुरक्षितता प्रदान करून ग्राहक, सभासदांचा विश्वास जपला जाईल व येवलेकरांना सेवा देत त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी खात्री या निमित्ताने समता परिवाराच्या वतीने देण्यात आली.

या प्रसंगी संचालक संदीप कोयटे,गोदावरी संघाचे सेवानिवृत्त जन.मॅनेजर श्रीनिवास माधव देशपांडे,महाव्यवस्थापक सचिन भट्टड,येवला मर्चंट बँकेचे सेवानिवृत्त सरव्यवस्थापक श्री.मदनलाल चंडालिया, कर्मचारी सतीश देहाडराय, सुप्रसिध्द बिल्डर व्यावसायिक श्री.शैलेशजी गुजराथी, हॉटेल व्यावसायिक सुनील कायस्थ, लष्करी सेवेतील निवृत्त जवान माणिक बडोदे,हिंमतलाल पटेल,श्रीमती बिना क्षत्रिय,शीला शैलेश गुजराथी,जनमंगल ठेव प्रतिनिधी राजश्री रविंद्र कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार शाखाधिकारी आप्पा कोल्हे यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close