जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

…येथे शिकारीच बनला शिकारी !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील आपल्या भावाचे मृत्यूबाबत दाखल असलेल्या अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये पाच हजार रुपये रुपयांची लाच स्वीकारण्याची घटना घडून दोन दिवस उलटत नाही तोच आज कोपरगाव तहसील कार्यालयातील कारागृह लिपिक रवींद्र नारायण देशमुख (वय-४८)याला आज लाचलुचपत विभागाने एका खटल्यातील नूक्ती बंद करण्यासाठी पढेगाव येथील इसमाकडून ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.एकाच आठवड्यात कोपरगाव तालुक्यात ही दुसरी घटना घडल्याने भ्रष्टाचार महसूल विभागात कीती बोकाळला आहे याचे हे नवे उदाहरण ठरले आहे.देशमुख याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक उज्वल पाटील यांनी रंगेहात पकडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करा.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रत्येक ठिकाणी आपल्या मदतसाठी सज्ज आहे.असे आवाहन हा विभाग वारंवार करत असला तरी मात्र सामान्य नागरिक मात्र या विभागाकडून जरा फटकुनच वागत असतो.मात्र एखाद्या प्रकरणात लोकसेवकानी जास्तीची अपेक्षा वाढली तर वैतागलेला नागरिक मात्र अखेरच्या क्षणी या जाचातून मुक्त होण्यासाठी या विभागाचा दरवाजा खटखटावतात.याचे दुसरे दुर्मिळ उदाहरण नुकतेच धोंडेवाडी पाठोपाठ कोपरगाव तहसीलदार कार्यालयात उघड झाले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा विभाग मानला जातो.भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे.तेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ध्येय असल्याचे मानले जाते.शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवित आहे.जर कोणत्याही शासकीय कामाकरीता शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केली तर नागरिकांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन हा विभाग वारंवार करतो.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सदैव अशा नागरिकांच्या बाजुने ठामपणे उभे राहिल आणि लाचखोरांविरूद्ध कारवाई करेल असा विश्वासही दिला जात असतो.भ्रष्टाचार मुक्त समाज राज्याला प्रगती,समृद्धी आणि सुशासनाच्या युगामध्ये घेऊन जाईल.हे केवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाने व सहकार्यानेच शक्य होऊ शकेल.समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करा.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रत्येक ठिकाणी आपल्या मदतसाठी सज्ज आहे.असे आवाहन हा विभाग वारंवार करत असला तरी मात्र सामान्य नागरिक मात्र या विभागाकडून जरा फटकुनच वागत असतो.मात्र एखाद्या प्रकरणात मात्र लोकसेवकानी जास्तीची अपेक्षा वाढली तर वैतागलेला नागरिक मात्र अखेरच्या क्षणी या जाचातून मुक्त होण्यासाठी या विभागाचा दरवाजा खटखटावतात.याचे उदाहरण नुकतेच धोंडेवाडी या ठिकाणी उघड झाले असतानाच आज पुन्हा दुसरी घटना तहसीलदार कार्यालयात घडली आहे.

अदखल पात्र गुन्हे कोपरगाव दंडाधिकारी यांचे समोर सुनावणीसाठी येत असतात.त्या ठिकाणी किमान तीन ते चार तारखा देऊन दोन्ही गटांना प्रतिबंधक कारवाई केली जाते.नेमकी याच गोष्टीचा उपकारागृह लिपिक रवींद्र देशमुख याने गैरफायदा उचलून तक्रारदाराला आपली शिकार बनवले मात्र येथे सावज सावध असल्याने शिकारीच येथे शिकार झाल्याचे दुर्मिळ उदाहरण घडले आहे.पढेगाव येथील तक्रारदाराची खटल्याची नूक्ती बंद करण्यासाठी त्याने पाचशे रुपयांची लाच मागितली व तीच संधी साधून तक्रार दाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून शिकाऱ्यालाच शिकार बनवून त्याचा खेळ खल्लास करून टाकला आहे.पंचासमक्ष रोख रक्कम स्वीकारताना रवींद्र देशमुख यास जेरबंद केले आहे.विशेष योगायोग म्हणजे आजच आ.आशुतोष काळे यांनी आयोजित महसूल आढावा बैठकीत नागरिकांनी महसूल विभागाच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींचा पाऊस पडला होता.व तहसील कार्यालयात व महसुली विभागात तालुक्यात शेतकऱ्यांना लाच देण्यासाठीबकसे बाध्य केले जाते त्याचा पाढाच आज संजय काळे व राजेंद्र खिलारी अन्य नागरिकांनी वाचला असतानाच ही घटना उघड झाल्याने कोपरगाव तहसील कार्यालयाचा भ्रष्टाचारी चेहरा पुन्हा उघड झाला आहे.

कोपरगाव तालुक्यात सामान्य माणूस बऱ्याच वेळा अज्ञानामुळे या शिकाऱ्यांच्या ताब्यात सापडला जातो.व भरडला जाऊन त्याच्याकडून लोकसेवक लाचेची मागणी करून त्याना ती देण्यासाठी मजबूर करतात.असाच काहीसा प्रकार कोपरगाव तहसील येथें घडला आहे. या ठिकाणी घडला असून या ठिकाणी संतप्त झालेल्या पढेगाव येथील इसमाने (वय-३५) लाच मागणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याच्या विरुद्ध थेट नगर येथील लाचलुचपत विभागाशी दि.१२ ऑक्टोबर रोजी संपर्क साधून यातून वाचविण्याचा मार्ग विचारला असताना या विभागाने त्यास मदत करून त्या महसूल कर्मचाऱ्याविरुद्ध सापळा लावून रुपये पाचशे रुपयांची लाच घेताना महसूल कर्मचारी रवींद्र देशमुख यास पंचासमक्ष नुकतेच जेरबंद केले आहे.त्या बाबतीत रोख रक्कम जप्त केली आहे.

या बाबत नाशिक विभागाचे पोलीस अधिक्षक सुनील कडासने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मृदुला नाईक लाच प्रतिबंधक विभाग नाशिक,सापळा पथक – पो.ह.वा.कुशारे,पोहवा.गोसावी,पो.ना. महाजन,पो.ना. बाविस्कर,पो.ना.शिंपी ला.प्र.वि.नाशिक आदींनी सहकार्य केले आहे.दरम्यान या घटनेने कोपरगाव तहसील व तालुक्यात खळबळ उडाली आहे.या घटनेने लाच घेणाऱ्या लोकसेवकांना चाप बसण्यास मदत होणार आहे.लाच लुचपत विभागाच्या या कारवाईचे नागरिकांनी जोरदार स्वागत केले आहे.

Related Articles

Close