आरोग्य
कोपरगावात आज रुग्ण वाढ घटली !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात सलग कोरोना वाढ नवनवे उच्चांक आहे काल ४१ रुग्ण वाढुन २० रुग्णांचे निधन झाले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण १५ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून त्यात एकही रुग्ण बाधित निघाला नाही.तर १७ संशयित रुग्णांना घरी सोडून दिले आहे.नगर येथे तपासणीसाठी ३९ संशयितांचे अहवाल पाठवले आहे. तर खाजगी प्रयोग शाळेतील अहवालात ०८ बाधित निष्पन्न झाली आहे.तपासणीत तर १५ जण निरंक निघाल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी कृष्णा फुलसौन्दर यांनी दिली आहे.आज रुग्ण वाढ कमी झाल्याने प्रशासनाने निश्वास टाकला आहे.
कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ०६ हजार ५१९ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा ४२ लाख ८४ हजार १०३ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ७२ हजार ८४३ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ०९ लाख २३ हजार ६४१ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू २७ हजार ०२७ वर जाऊन पोहचला आहे.
दरम्यान आज नगर जिल्ह्यात आज अखेर २४ हजार ९३८ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून आजपर्यंत ३५५ जणांना मृत्यूने गाठले आहे.तर कोपरगाव तालुक्यात कोरोना बाधित आढळलेल्या रुग्णांत कोपरगाव शहरांतील ०५ रुग्ण असून तालुक्याच्या ग्रामीण भागातील ०३ असे एकूण ०८ रुग्ण बाधित आढळले आहे.
कोपरगाव शहरातील बाधित कोरोना रुग्ण पुढील प्रमाणे लक्ष्मीनगर एक महिला वय-५०,एक पुरुष वय-२४ टाकळी फाटा एक पुरुष वय-४७,संजय नगर -एक पुरुष वय-३६,धारणगाव रोड येथील एक पुरुष वय-७९, असे एकूण पाच रुग्ण बाधित आढळले आहेत.
तर तालुक्याच्या ग्रामीण भागात आढळलेले रुग्ण पुढील प्रमाणे करंजी एक महिला वय-६२,कोळपेवाडी दोन पुरुष वय-४२,७० आदी तीन रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ११०० इतकी झाली आहे.त्यात १६२ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत २० जणांचे कोरोना या साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.८१ टक्के आहे.आतापर्यंत ०४ हजार ८५७ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला १९ हजार ४२८ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २२.६४ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ९१८ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ८३.४५ टक्के झाला आहे.दरम्यान या आकडेवारीमुळे नागरिकांना आज दिलासा मिळाला आहे.