कोपरगाव तालुका
..त्या नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यास झाला प्रारंभ
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागाला रविवारी झालेल्या वादळी पावसामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते.महसूल व कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास मदत झाली आहे.
रविवारी अचानक आलेल्या नैसर्गिक संकटामुळे मका,बाजरी,कपाशी,कांदा रोप,ऊस आदी पिके भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यावर आलेल्या या संकटाचे पंचनामे करण्याचे आदेश आ.आशुतोष काळे यांनी दिले होते.या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करतील असे आश्वासन उपाध्यक्ष सुधाकर रोहोम व सभापती पोर्णिमा जगधने यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिले आहे.
रविवारी दुपारी चारच्या सुमारास पावसाने कहर केला होता.त्यातून तालुक्याच्या पूर्व भागात उभ्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.त्यात सोयाबीन,बाजरी,मका,चारा पिके,ऊस,कापूस,आदींचे मोठे नुकसान झाले होते.या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली होती.त्याच दिवशी सायंकाळी उशिरा तहसीलदार योगेश चंद्रे व कृषी अधिकारी अशोक आढाव,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, यांनी झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला होता.मात्र रात्री उशिर झाल्यामुळे झालेल्या नुकसानीचा नेमका अंदाज आला नव्हता.मात्र सोमवारी सकाळीच सभापती पौर्णिमा जगधने,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी पूर्व भागात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे.
दरम्यान आज दुपारी पाच वाजेच्या सुमारास आज पढेगाव शिवारात आज सलग दुसऱ्या दिवशी वादळासह गारा आणि पाऊस पडल्याची माहिती तेथील शेतकरी उत्तमराव चरमळ यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली असून या वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली असून पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती दिली आहे.व या भागातील पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
यावेळी कारभारी आगवन,पंचायत समिती उपसभापती अर्जुन काळे,सदस्य मधुकर टेके,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय आगवन, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,सहाय्यक गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, सर्व कृषी सहाय्यक,तलाठी, ग्रामसेवक व शेतकरी आदी मान्यवर उपस्थित होते.