कोपरगाव तालुका
कोपरगावातील शेतकरी बोर्डिंग पुन्हा उभी करा-मागणी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील न्यायालयानजीक असलेले शेतकरी विद्यार्थी वसतिगृह (शेतकरी बोडींग) अनेक वर्षांपासून पाडून टाकलेली असुन सदर ठिकाणी काटेरी वनस्पतींचे साम्राज्य उभे राहिले आहे.सदर इमारत पुन्हा पूर्वरत उभी करून शेतकऱ्यांच्या मुलांची वसतिगृहाची सोय करून द्यावी अशी महत्वपूर्ण मागणी बळीराजा पार्टीच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नुकतीच केली आहे.
सहकारी साखर कारखानदारी साठच्या दशकात नगर जिल्ह्यात उभी राहिली त्या वेळी ग्रामीण भागातून शिक्षणासाठी तालुक्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या कारखान्याच्या सभासदांनी आपल्या उसाच्या टननिहाय कपात करून निधी उभा करून शेतकरी पुत्रांना शिक्षणाची ज्ञानगंगा खेड्यापाड्यात नेण्यासाठी या वसतिगृहाची सोय करण्यात आली होती.
सहकारी साखर कारखानदारी साठच्या दशकात नगर जिल्ह्यात उभी राहिली त्या वेळी ग्रामीण भागातून शिक्षणासाठी तालुक्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या कारखान्याच्या सभासदांनी आपल्या उसाच्या टननिहाय कपात करून निधी उभा करून शेतकरी पुत्रांना शिक्षणाची ज्ञानगंगा खेड्यापाड्यात नेण्यासाठी या वसतिगृहाची सोय करण्यात आली होती.नंतर अनेक शेतकरी पुत्र आणि मुलींचे लग्नसोहळेही या ठिकाणी मोठ्या धामधुमीत पार पडत असत.तशी ती जुन्या काळात परंपरा पडली होती व तेथील लग्न म्हणजे प्रतिष्ठेचे ठरत असत मात्र नंतरच्या काळात वसंत दादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री बनल्यावर त्यांनी ८० च्या दशकात साखर कारखान्यांना तंत्र शिक्षणाच्या संस्था मंजुरी देण्याचा निर्णय घेतला.ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कपातीतुन या संस्था उभ्या राहिल्या.व पुढे या या साखर कारखान्यांनी त्या संस्थानशी संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालये व सोबत वसतिगृहे काढल्यावर या शेतकरी बोर्डिंग मागे पडत गेल्या त्याना एक प्रकारची अवकळा प्राप्त झाली.ती नंतर बंद पडून आजची दुरवस्था प्राप्त झाली आहे.ग्रामिण भागातील अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोपरगाव येथे येत असतात.त्याचे राहाण्याची व जेवणाची सोय व्हावी याकरिता शेतकरी विद्यार्थी वसतिगृह (शेतकरी बोडींग) उभारण्यात आलेली होती परंतू मागील अनेक वर्षांपासून शेतकरी विद्यार्थी वसतिगृह शेतकरी बोडींग बंद असल्याने अनेक विद्यार्थीची कुचंबना होत आहे तरी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे हितासाठी, त्यांचे शिक्षणाची आबाळ व गैरसोय होवू नये,याकरिता शेतकरी विद्यार्थी वसतिगृह( शेतकरी बोडींग) कोपरगांवचे लवकरात लवकर पुनर्निर्माण करण्यात यावे तसेच आदेश संबंधितांना देण्यात यावे अशी विनंती या निवेदनात केली आहे.व या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास बळीराजा पार्टी कोपरगाव यांचे वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी उपस्थित बळीराजा पार्टी तालुका अध्यक्ष अमोल आचारी, उपाध्यक्ष किरण महाजन,सचिव इमरान तांबोळी,अखिलेश देशमुख व शाखा प्रमूख अजिंक्य भुजबळ आदी उपस्थित होते.