जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पत्रकारितेत नकारात्मक बातम्या देणे गरजेचे,मात्र वर्तमानात स्थिती उलट -…या संपादकांचे खडे बोल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

पत्रकारितेत प्रस्थापितांच्या नकारात्मक व समाजाला उपयुक्त बातम्या देणे गरजेचे असताना वर्तमानात उलट स्थिती दिसत असल्याचे वास्तव लोकमत डिजिटल नेटवर्कची संपादक आशिष जाधव यांनी कोपरगाव तालुक्यात एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे.

राहाता तालुक्यात २०१४ साली मुख्यमंत्र्यांच्या सभेत निळवंडे कालवा कृती समितीच्या शेतकऱ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्यात पत्रकार नानासाहेब जवरे व त्यांच्या सहकाऱ्यांना कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याबद्दल प्रास्तविकात माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांनी अभिनंदन केले आहे.व कोपरगावातील पत्रकार दर्जेदार असून मूळ प्रश्नाला न्याय देतात असे कौतुक केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे वतीने बाळशास्त्री जांभेकर यांचे जयंती निमित्त पत्रकार दिन साजरा करताना तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार समारंभ करखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते आयोजित केला होता.त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे,लोकमतचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे संपादक आशिष जाधव,मल्टी मीडियाचे पत्रकार नरेन्द्र भडांबे,कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक कारभारी आगवन,नारायण मांजरे,बाळासाहेब बारहाते,संचालक सचिन रोहमारे,घुमरे,आदी मान्यवरांसह कोपरगाव,राहाता तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की,”वर्तमानात प्रस्थापितांविरुद्ध पत्रकारिता होत होती आता ती त्यांच्या साठी निर्माण झाली आहे.आपण जेष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हाताखाली तयार झालो आहे.बातमी खिशात ठेवणे कधीही वाईट.नगर जिल्ह्यात तर सामाजिक संकेतस्थळे तर तर खूप फोफावले आहे त्यातून अनेकांना रोजगार मिळत असतात.वर्तमानात इलेक्ट्रॉनिक मीडियाला लोक मोदी मीडिया म्हणून टीका करू लागले आहेत.पत्रकारितेचे आकर्षण निर्माण झाले असून त्याने त्याचा दर्जा घसरला आहे.मोजके काम मात्र गुणवंत काम असेल तर त्याला सोशल मीडियात आजही किमंत असून भविष्य आहे.पत्रकार बनणे सोपे पण पत्रकार होणे कठीण आहे.वर्तमानात बातम्यांचा व्यवसाय बनला आहे.जो जास्त व्यवसाय आहे त्यालाच बातमीदारीत किंमत आली आहे.फोटो फिचर पत्रकारिता झाली आहे.

तरीही महाराष्ट्रात आजही चांगल्या पत्रकारितेचे वाचक असून त्याची दखल राजकीय नेत्यांना घ्यावीच लागते.हे विसरता येणार नाही.

सध्या पत्रकारांचे गटतट निर्माण झाले असू ते विविध ब्रिग्रेडणे ओळखले जातात हे दुर्दैवी आहे.पत्रकारात आता काही वॉच डॉग आहे त्या पासूनच मोठा धोका पत्रकारांना आहे.याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.मातब्बर नगर जिल्ह्यात रस्त्यांचे वाटोळे झाल्याचे त्यांनी स्पष्ट करून आमचा यवतमाळ जिल्हा मागास असताना तो प्रगत वाटावा अशी स्थिती आहे.यावर बातमीदारी करणे गरजेचे आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,”जिल्ह्यात प्रत्येक एक एक वतनदार आहे.येथे अनेक वेळा लोकप्रतिनिधी निवडून येतात.येथील लोकप्रतिनिधी दर मंगळवारी मुंबईत असतात.तर दर रविवारी ते आपल्या गावी अथवा मतदारसंघात असतात म्हणून ते अनेकवेळा निवडून येतात.वर्तमान महाघाडीचे सरकार वर्क फॉर्म होम काम करत असल्याची टीका त्यांनी केले आहे.व त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयविकाराच्या शस्रक्रिये बाबत आपला अनुभव व बातमीदारी आपल्या अनुभवातुन विषद केली आहे.व भविष्यात २०२४च्या निवडणुकीत आव्हान महत्वाचे आहे.आव्हान देणारा कोण हे महत्वाचे नाही.वर्तमानात राज्यातील सरकारचे काय होईल हे सांगता येणार नाही.इतके राजकारण अस्थिर बनल्याचे विशद केले आहे.हे सरकार स्थापन करताना कोणाही वर्तमानपत्राला वा पत्रकारांना याचा अंदाज नव्हता हे विशेष!हे सरकार त्या वेळी स्थापन झाले असते तर त्यावेळी कदाचित राष्ट्रपती सरकार उठले नसते.पण ते फडणवीस यांच्या ८०तासाच्या सरकारने ती उठवली त्याचा फायदा या सरकारला झाला हे वास्तव आहे.

राज्यातून भाजपला हटवणे एवढे सोपे नाही त्यानी एकूण मतांच्या ३८टक्के मते मिळवली आहे.देशात भाजप हटवणे तर खूपच अवघड असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

उपस्थित पत्रकारांचा सत्कार आ.काळे त्यांच्या हस्ते करण्यात आला आहे.त्यावेळी त्यांनी उपस्थित पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.व कोपरगावातील रस्त्यांचे काम प्रगतीपथावर आहे ते लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन दिले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे,यांनी केले तर प्रा.साहेबराव दवंगे,आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कारखान्याचे संचालक अरुण चंद्र यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुधाकर रोहोम यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close