जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

धारणगाव रस्त्याचे काम लवकरच पूर्णत्वास-आश्वासन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या धारणगाव रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. मात्र या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरु करून नागरिकांना होणारा त्रास थांबणार आहे असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी दिल्या.

दरम्यान या रस्त्याचे भूमीपूजनाचे वेळेस जेष्ठ कार्यकर्ते उमेश धुमाळ यांनी रस्त्याचे काम करताना उडणाऱ्या धुळीचा बंदोबस्त करण्यासाठी हे काम रात्रीच्या सुमारास करावे अशी सूचना आ.आशुतोष काळे यांना केली असता त्यांनी ती संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे.त्याचे धारणगाव रस्त्याचे लगत असलेल्या व्यापारी व रहिवाशांनी स्वागत केले आहे.

कोपरगाव शहरात वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत २ कोटी १० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या धारणगाव रोड मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, ९९ लक्ष ६० हजार रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या कोपरगाव नगरपरिषद प्रशासकीय इमारतीसमोरील उद्यान सुशोभीकरण करणे व ६८ लक्ष ९१ हजार रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या कोपरगाव नगरपरिषद इमारत वॉल कंपाउंड करणे कामाचे भूमिपूजन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले की, कोपरगाव शहरात विविध ठिकाणी सुरु असलेली विकासकामे गुणवत्तापूर्ण करून हि कामे रेंगाळणार नाही याची काळजी कोपरगाव नगरपरिषद प्रशासन व सबंधित ठेकेदाराने घेवून विकासकामे लवकरात पूर्ण करावी. कोपरगाव शहराच्या विकासासाठी माझ्याकडून निधीची कमतरता पडणार नाही. आलेल्या निधीतून होणारी कामे दर्जेदार व्हावी. विकासकामे सुरु असतांना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे हि विकास कामे रेंगाळणार नाही याची काळजी घेवून दिलेल्या मुदतीत कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने पूर्ण करून घ्यावीत जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशा आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.

यावेळी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, शिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडियाल, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, मेहमूद सय्यद,प्रतिभा शिलेदार,श्रीमती वर्षा गंगूले,माधवी वाकचौरे, अजीज शेख,राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, रमेश गवळी,कृष्णा आढाव,फकीर कुरेशी,दिनकर खरे, जावेद शेख,राहुल देवळालीकर,चंद्रशेखर म्हस्के,प्रकाश दुशिंग,प्रफुल्ल शिंगाडे,मंदार आढाव,बाळासाहेब साळुंके,राहुल देशपांडे,राजेश मारवा,उमेश धुमाळ, विजय त्रिभुवन आदींसह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close