जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावचे विकास आगामी काळातही सुरू ठेवणार-आश्वासन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव मतदार संघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने सर्व मतदार संघाची जबाबदारी माझ्यावर असून ती समर्थपने पार पाडत असून आगामी काळातही ती अव्याहतपणे सुरू राहील असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे म्हटले आहे.

कोपरगाव तालुक्यातील रवंदे ब्राह्मणगाव येथे ३ कोटी १० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या रामा ७ – धामोरी-रवंदे- ब्राह्मणगाव-करंजी-दहेगाव बोलका-धोत्रे-खोपडी (प्रजिमा ४) रस्त्यावर किमी १०/०० ते १२/५००, १५/०० ते १६/५०० मध्ये (गाडे वस्ती ते रवंदे व ब्राह्मणगाव रस्ता) डांबरीकरण व मजबुतीकरण करणे कामाचे भूमिपूजन तसेच व ब्राह्मणगाव येथे ५० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या रामा ७ – धामोरी-रवंदे-ब्राह्मणगाव-करंजी,दहिगाव बोलका-धोत्रे-खोपडी (प्रजिमा ४) रस्त्यावर किमी १५/४०० मध्ये पुलाचे बांधकाम करणे कामाचे भूमिपूजन नुकतेच त्यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुनराव काळे,कारभारी आगवन,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अशोकराव काळे,अरुण चंद्रे,विठ्ठल आसने,पंचायत समिती सदस्य अनिल कदम, श्रावण आसने,किसनराव आहेर,भाऊसाहेब देवकर,तान्हाजी कदम,प्रल्हाद वाघ,गणेश घायतडकर, उत्तम भुसे,काकासाहेब लामखडे,चंद्रभान कदम,शांताराम सांगळे,गणेश कुटे,शिवाजी घायतडकर,प्रकाश खोंड,बाबासाहेब सांगळे,सर्जेराव घायतडकर, सोमनाथ घायतडकर,सुभाष दवंगे,दत्तात्रय कदम,विलास दवंगे,चंद्रकांत खिलारी,महेंद्र काळे,जितेंद्र काळे,दिलीप भुसे,आप्पासाहेब देवकर,छगणराव देवकर,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकरी अभियंता प्रशांत वाकचौरे,आदी उपस्थित होते.

त्या वेळी पुढे बोलताना म्हणाले की,”मतदार संघातील जनतेने दिलेली जबाबदारी पार पाडत असतांना जनतेच्या आशीर्वादाने महाविकास आघाडी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर निधी आणला आहे.मतदार संघात अनेक विकास कामे सुरु असून त्या विकास कामांचा प्रत्येक गावातील नागरिकांना दीर्घकाळासाठ फायदा होणार आहे. अजूनही अनेक विकास कामांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असून लवकरच त्या प्रस्तावांना मंजुरी मिळणार आहे त्याबाबत पाठपुरावा सुरु असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close