कोपरगाव तालुका
राहाता पंचायत समितीत गुरुवारी आ. काळेंचा जनता दरबार
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या राहाता तालुक्यातील गावातील नागरिकांना शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडी-अडचणी जाणून घेवून त्या अडीअडचणीवर उपाय योजना करण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांसमवेत आ.आशुतोष काळे गुरुवार (दि.६) रोजी दुपारी ३.०० पंचायत समिती कार्यालय राहाता येथे “जनता दरबार” घेणार असून या जनता दरबारात आपल्या अडी-अडचणी मांडण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या राहाता तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे तसेच अपंग व्यक्ती, विधवा महिला, जेष्ठ नागरिक, माजी सैनिक, शेतकरी अशा सर्व स्तरातील नागरिकांचे प्रश्न सुटले जावे या उद्देशातून हा जनता दरबार घेतला जाणार आहे. या जनता दरबारासाठी महावितरण, महसूल, पोलीस प्रशासन, विमान प्राधिकरण आदी विभागाचे शासकीय कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
मागील महिन्यात आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडी–अडचणी जाणून घेण्यासाठी तहसील कार्यालय कोपरगाव येथे जनता दरबार घेतला होता. या जनता दरबाराला कोपरगाव तालुक्यातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. या जनता दरबारात नागरिकांनीं मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या होत्या.वेळ अपुरा पडल्याने अखेर हा दरबार त्यांना आवरता घ्यावा लागला होता. त्यावेळी आ. आशुतोष काळे यांनी सर्व नागरिकांच्या अडचणी समजावून घेत सर्व शासकीय अधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रश्नांचे गांभीर्य ओळखून तातडीने प्रश्न सोडवा अशा सूचना केल्या होत्या. त्याच धर्तीवर कोपरगाव विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या राहाता तालुक्यातील सर्वसमान्य नागरिकांचे तसेच अपंग व्यक्ती, विधवा महिला, जेष्ठ नागरिक, माजी सैनिक, शेतकरी अशा सर्व स्तरातील नागरिकांचे प्रश्न सुटले जावे या उद्देशातून हा जनता दरबार घेतला जाणार आहे. या जनता दरबारासाठी महावितरण, महसूल, पोलीस प्रशासन, विमान प्राधिकरण आदी विभागाचे शासकीय कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे कोपरगाव विधान सभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या राहाता तालुक्यातील गावातील नागरिकांनी तसेच कोपरगाव तालुक्यातील ज्या गावातील नागरिकांना आपल्या शासकीय कामासाठी राहाता तालुक्याच्या विविध शासकीय कार्यालयात जावे लागते. व ज्यांचे प्रश्न आजही अनुत्तरीत आहे अशा नागरिकांनी या जनता दरबारासाठी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.