जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

उमाजी नाईक यांचा चित्रपट प्रदर्शित करा-मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

शिर्डी (प्रतिनिधी)

आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या शौर्याचा इतिहास सर्व देशवासियां पर्यंत पोहोचवा यासाठी आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक नावाने असणारा प्रस्तावित चित्रपट लवकर प्रदर्शीत होण्यासाठी प्रयत्न करण्याचे तसेच क्रांतिकारी रामोशी समाजाच्या इतर मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत समाजाचा एक प्रतिनिधी विधानपरिषद वर असावा यासाठी पाठपुरावा करू, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांनी केले आहे.

मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात आमदार जयंत पाटील यांनी व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी उमाजी नाईकांना पुष्पहार घालून अभिवादन केले आहे.यावेळी नामदार जयंत पाटील यांनी उमाजी नाईक हे देशासाठी हुतात्मा झाले ,त्यांचा सर्वांना देशवासीयांना मोठा अभिमान आहे ,त्यांचे कार्य खूप मोठे आहे, क्रांतिवीर उमाजी नाईक हे फक्त रामोशांची नव्हे तर ते संपूर्ण देशवासीयांचे एक नेते होते, असे सांगून उमाजी चा क्रांतिकारी रामोशी समाजाला राज्यात कुठे तरी प्रतिनिधित्व मिळावे यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

सामाजिक न्याय मंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी रामोशी हा क्रांतिकारी समाज असून भटक्या जमातीत असणारा हा समाज आजही उपेक्षित जीवन जगत आहे.अशा क्रांतिकारी समाजाचा विकास व प्रगती करण्यासाठी शासकीय स्तरावर विविध योजना राबवून समाजाची प्रगती विकास साधण्याचा प्रयत्न केला जाईल असेही आश्वासन दिले.तत्पूर्वी रामोशी समाजाच्या वतीने नरवीर उमाजी नाईक समाजसुधारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांनी समाजाला इतर राज्यांप्रमाणे अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावे, शासकीय स्तरावर उमाजी नाईक यांची पुण्यतिथी साजरी होऊन राज्यभरात शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय येथे उमाजी यांची पुण्यतिथी 3 फेब्रुवारीला साजरी व्हावी, आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रस्तावित चित्रपटास शासनाने पूर्णता अनुदान द्यावे.अशा विविध मागण्यांचे निवेदन दिले, तत्पूर्वी नामदार पाटील,नामदार मुंडे यांनी मंत्रालयात आद्य क्रांतिवीर उमाजी नाईकांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.त्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही ही उमाजी नाईक बद्दल गौरवोद्गार काढले.नामदार जयंत पाटील, नामदार धनंजय मुंडे व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना समाजाच्या वतीने व नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाच्यावतीने आद्य क्रांतिवीर उमाजी नाईकांची प्रतिमा भेट देण्यात आली.यावेळी पवार यांनी सुद्धा समाजाच्या मागणीला सकारात्मक मान्यता दिली.

या कार्यक्रमाला मंत्रालयात नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळाचे प्रांताध्यक्ष वसंतराव चव्हाण, राज्य सरचिटणीस राजेंद्र गडकरी संघटनेचे देवराम गुळवे, बंडोपंत खर्डे गुरुजी, सिताराम जेडगुले, शिवाजी गडकरी,संजय चव्हाण, बाळासाहेब नाईक ,संजय शिरतार, ज्ञानेश्वर गुरु कुले, सिताराम जेडगुले, संतोष शिरतार,साहेबराव गुरुकुले, विमल चव्हाण, हर्षवर्धन चव्हाण, मुक्ता चव्हाण, सुभाष जेडगुले,कृष्णा जमादार आदींसह राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या १८८ पुण्यतिथीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनीही ही शुभेच्छा संदेश पाठवले होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close