जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आ.काळेंच्या मागण्यांना मुख्यमंत्र्यांचा मिळाला प्रतिसाद

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या रखडलेल्या विविध विकास कामांसाठी निधी देऊन मतदार संघातील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे शासनाकडे देय असलेले अनुदान तातडीने द्या अशा अनेक मागण्या कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडल्या असता मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांना प्रतिसाद दिला असून या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी कोपरगावच्या न्यायालयीन इमारतीसाठी प्रस्ताव मागितले आहे.

नाशिक येथे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच अहमदनगर जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघातील मागील पाच वर्षापासून प्रलंबित असलेल्या विविध विकासाच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. यामध्ये २०१८-१९ च्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती बाधित ३० गावांतील शेतकऱ्यांचे १५ कोटी ८८ लाख रुपये अनुदान प्रलंबित असून ते अनुदान तातडीने शेतकऱ्यांना मिळावे. ऑगस्ट २०१९ मध्ये गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नुकसान भरपाईची देय रक्कम २ कोटी ४ लाख रुपये मिळावी. धारणगाव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी नूतन सुप्रमा मंजुरी मिळावी. कोपरगाव मतदारसंघातील सर्वच रस्ते अतिशय खराब झाले असून त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला असून या खराब रस्त्यांसाठी निधी मिळावा. गोदावरी कालव्यांची निर्मिती होऊन जवळपास ११५ वर्षाचा कालावधी झाला असल्यामुळे हे कालवे अतिशय जीर्ण झाले असून त्याचा परिणाम गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रातील शेती सिंचनावर सातत्याने होत आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांच्या नूतनीकरणासाठी निधी द्यावा. दि. २५ एप्रिल २०१९ चा शासन निर्णय शिथिल करून जलसंधारण विभागामार्फत बंधारे बांधण्यास परवानगी मिळावी. धोत्रे, तळेगाव मळे, लौकी, खोपडी व घोयेगाव येथील शेतकऱ्यांना नांदूर मधमेश्वर कालव्यांच्या (एक्सप्रेस कॅनॉल) चारी क्र. १ व २ च्या भूसंपादनात गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळालेला नाही तो मोबदला या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावा. कोपरगाव मतदारसंघातील विविध गावांतील युती शासन काळातील रखडलेल्या पाणी योजना कार्यान्वित करण्यासाठी निधी मिळावा. तसेच काही दिवसांपूर्वी आ. काळे यांनी न्यायालय परिसरात भेट दिली असता न्यायालयाच्या इमारतींची झालेली दुरावस्था त्यांनी पहिली होती. त्याची दखल घेऊन त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन कोपरगाव शहरातील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या ब्रिटीशकालीन इमारतींची नव्याने बांधण्यासाठी निधीची मागणी केली होती. या मागणीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेवून नवीन इमारतीसाठी प्रस्ताव पाठवा त्याबाबत तात्काळ कार्यवाही करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close