कोपरगाव तालुका
पाकिस्तानातील ..त्या हत्येचा निषेध करावा तेवढा कमीच-वहाडणे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पाकिस्तानातील गुरुद्वारावर झालेला हल्ला हा भ्याड असून त्या देशात कायदा सुव्यवस्था हि नाम मात्रही उरलेली नाही अल्पसंख्याक समाज हा अखेरच्या घटका मोजत असून या पार्श्वभूमीवर भारतात नागरिकत्व कायद्याला होणारा विरोध हा केवळ मतांचे राजकारण असल्याची टीका कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोपरगाव येथे आयोजित एका मोर्चा प्रसंगी केली आहे.
पाकिस्तानातील अल्पसंख्य समाजाच्या मुली सुरक्षित राहिल्या नाही त्यांचे सक्तीने धर्मांतर केले जात असल्याची टीका केली आहे.पाकिस्तानातील अल्पसंख्य समाज मोठ्या प्रमाणावर घटला आहे.त्याची युनो मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.शिल्लक राहिलेल्या नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी भारत सरकारने पावले उचलावी अशी मागणी करतानाच जगात श्री गुरुनानक देवजी यांचा ५५० वे वर्ष साजरे केले जात असताना त्यांच्या पवित्र जन्मस्थळी अशी दुर्घटना झाल्याबद्दल या मोर्चात कठोर टीका सर्व पक्षीय वक्त्यांनी केली आहे.
पाकिस्तानातील गुरुद्वारावर काही धर्मांध शक्तींनी व असामाजिक तत्त्वांनी झुंडीने हल्ला करून तेथील शीख युवकाची गोळ्या घालून हत्या केल्याच्या निषेधार्थ आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व कोपरगाव येथील श्री गुरुसिंग सभा,व सर्वपक्षीय नागरिक कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुद्वारा येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,महात्मा गांधी चौक ते भाजीमार्केट रस्त्याने कोपरगाव तहसील कार्यालयाकडे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळो मोर्चाचे सभेत रूपांतर झाले त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाप्रांत संघटक विठ्ठलराव शिंदे,जेष्ठ नेते टेकचंद खुबाणी,माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे,जगतारसिंग शेखो, मेजरसिंग ओलाख,कोपरगाव नगरपरिषद राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके,नगरसेवक कैलास जाधव,मेहमुदभाई सय्यद,बलविंदरसिंग संबी,कुकुशेठ सहानी,पप्पूसिंग सहानी, सुखदीपसिंग सहानी,अड् मनोज कडू, जैन संघटनेचे अध्यक्ष संतोष गंगवाल,मौलाना नासिर,सनी पोथीवाल,आदींसह बहू संख्येने नागरिक हजर होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि,भारत हा सर्व धर्मीय देश असून या देशात सर्वधर्मीय नागरिकांना सर्वच अधिकारांचे विनियोग करता येतात मात्र पाकिस्तानात मात्र तेथे फक्त मुस्लिम नागरिकांच्या हक्कास प्राधान्य दिले जाते त्यामुळे अल्पसंख्यांक समाज तेथे धोक्यात आला आहे.या बाबत मोदी सरकारने नागरिकत्व कायदा करण्यास प्राधान्य हाती घेतले आहे ते सर्वार्थाने योग्य असून काही पक्ष व त्यांच्या नेत्यांना आपल्या मतांची बेगमी करण्याची घाई झाली आहे त्यामुळे ते घुसखोरांना आपल्या देशात घेण्यास व त्यांना सर्व हक्क प्रदान करण्यास सरसावले आहे.हा एक प्रकारचा राष्ट्रद्रोह असून नागरिकांनी या वाईट प्रवृत्तीचा निषेध करण्यास बाहेर पाडले पाहिजे अन्यथा आपला देश आपला राहणे कठीण होईल असा इशारा हि त्यांनी शेवटी दिला आहे.
त्या वेळी पाकिस्तानातील अल्पसंख्य समाजाच्या मुली सुरक्षित राहिल्या नाही त्यांचे सक्तीने धर्मांतर केले जात असल्याची टीका केली आहे.पाकिस्तानातील अल्पसंख्य समाज मोठ्या प्रमाणावर घटला आहे.त्याची युनो मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.शिल्लक राहिलेल्या नागरिकांची सुरक्षा करण्यासाठी भारत सरकारने पावले उचलावी अशी मागणी करतानाच जगात श्री गुरुनानक देवजी यांचा ५५० वे वर्ष साजरे केले जात असताना त्यांच्या पवित्र जन्मस्थळी अशी दुर्घटना झाल्याबद्दल या मोर्चात कठोर टीका सर्व पक्षीय वक्त्यांनी केली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक चेतन खुबाणी यांनी केले तर सुत्रसंचलन सुखदीपसिंग सहानी यांनी केले तर उपस्थितांचे आभार विजय जोशी यांनी शेवटी मानले.