कोपरगाव तालुका
रविवारी कोपरगावात मोफत सर्वरोग निदान शिबिर
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील जेष्ठ नागरिक संघाचे नेते स्व.भागचंद ठोळे यांच्या स्मरणार्थ कोपरगाव लायन्स क्लब व जेष्ठ नागरिक सेवा मंच,ठोळे उद्योग समूह व प्रवरा मेडिकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव शहरात श्रीमान गोकुळचंद विद्यालयात रविवार दि.१२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता मोफत सर्व रोगनिदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे .या शिबिराचा कोपरगाव शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन कोपरगाव लायन्स क्लबने केले आहे.