कोपरगाव तालुका
मंगळवारी चांदेकसारेत बाल भैरव जयंती उत्सव होणार साजरा
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव ( प्रातिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीतील आराध्य दैवत असलेल्या श्री बालभैरव या दैवताची येत्या मंगळवार दि.19 नोव्हेंबर रोजी जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
काळभैरव हे हिंदूंचे एक कुलदैवत आहे. हा शंकराचा अवतार असून काळभैरव, काळभैरवनाथ, काळभैरी, भैरव, मार्तंडभैरव, भैरवनाथ, केदारनाथ, बहिरीनाथ, भैरी(नाथ), मल्हारी, भैरोबा, खंडोबा, खंडेराय, रवळनाथ ही त्याची अन्य नावे आहेत. महाराष्ट्रात काळभैरव व भवानी ही अनेक कुटुंबांची कुलदैवते आहेत. काळभैरव-जोगेश्वरी, भैरी-भवानी, भैरी-जोगेश्वरी अशी दैवते कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या स्वरूपांत पूजली जातात. भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते, असे सांगितले जाते.
मंगळवारी संपन्न होणाऱ्या हा बाल भैरव जयंती उत्सवानिमित्त शेवगाव येथील ह.भ.प.अक्रूर महाराज साखरे,यांचे हरी कीर्तन संपन्न होणार आहे.या कार्यक्रमास राष्ट्रसंत जनार्धन स्वामी महाराज आश्रमाचे संत रमेशगिरी महाराज , खेडलेझुंगे येथील तुकाराम महाराज आश्रमाचे रघुनाथ महाराज खटाने, जनार्धन स्वामी आश्रमाचे अध्यक्ष मोहनराव चव्हाण,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या जयंती निमित्त सकाळी 8 वाजता भैरवनाथ मंदिरात सत्यनारायण पूजा व रुद्राभिषेक, संपन्न होणार आहे.सांयकाळी पाच वाजता श्रींची मिरवणूक ,सात वाजता ह. भ.प.अक्रूर महाराज साखरे यांचे हरिकीर्तन सांयकाळी उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.तरी या कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घायवा असे आवाहन श्रीराम रतन पंचायतन आश्रम ट्रस्ट व चांदेकसारे ग्रामस्थांनी केले आहे.