जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात आठवड्याने पाणी नागरिकांत नाराजी,पालिकेची जलसंपदाकड़े पाण्याची मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

पावसाळा नुकताच कुठे संपल्याचे वाटत असतानाच कोपरगाव शहरात नागरिकांना आठवड्याने पिण्याचे पाणी देण्याचा पालिकेने निर्णय घेतल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून गोदावरी नदीला अद्याप पाणी वाहत असतानाच हि पाणी टंचाई कशी निर्माण झाली असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.

कोपरगाव नगरपरिषदेने जलसंपदा विभागाकडे लवकरच आवर्तन देण्याची मागणी केली आहे.जलसंपदाने हिरवा कंदील दिला कि,आवर्तन कालावधी कमी करण्याचा पालिकेचा प्रयत्न राहील नागरिकांनी उगीच घाबरण्याचे कारण नाही. या बाबत आपण नाशिक जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेशी दि. 13 नोव्हेंबर रोजी पत्रव्यवहार केला असून उपलब्ध पाणी 15 डिसेंबर पर्यंत पुरणार आहे. आपण लवकर पाण्याचे आवर्तन द्यावे अशी मागणी केली आहे.-नगराध्यक्ष विजय वहाडणे

कोपरगाव शहरासह राज्यात या पावसाळ्यात पावसाने दमाने पण जोरदार हजेरी लावली असून पावसामुळे अखेरच्या टप्यात खरिपाची पिके धोक्यात आली असताना व शेतकरी नुकसानीची भरपाई मागत असतानाच कोपरगावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असल्याचे दुर्दैवी चित्र निर्माण झाले आहे.कोपरगाव नगरपरिषदेला पिण्याचे पाणी नांदूर मधमेश्वर उंचावनी बंधाऱ्यातून गोदावरी डाव्या कालव्याद्वारे पुरविण्यात येते पालिका ते पाणी आपल्या एकूण चार साठवण तलावात साठवून ते पाणी आवर्तनाद्वारे नागरिकांना पुरवते.

कोपरगाव नगरपरिषदेने पाण्याचे सुयोग्य नियोजन करून पाण्याचे दिवस कमी करण्याचा प्रयत्न करावा उगीच नागरिक व महिला यांना वेठीस धरू नये अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस या बाबत आवाज उठविल-राष्ट्रवादी गटनेते विरेन बोरावके

कोपरगाव पालिकेचे साठवण तलाव येसगाव ग्रामपंचायत हद्दीत असून या ठिकाणाहून पालिका आपल्या साईबाबा कॉर्नर जवळील जलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे ते नागरिकांना शुद्ध करून पुरवते.यंदा पाऊस पाणी राज्यात मुबलक प्रमाणात झाला आहे एवढेच नव्हे तर अतिरिक्त पाऊस होऊन त्याने खरीप पिकांचे बरेच नुकसान झाले आहे.पाऊस आत्ता कुठे थांबला आहे.असे असताना कोपरगाव नगरपरिषदेने 17 नोव्हेंबर पासून शहरात भोंग्याद्वारे नुकतीच दवंडी देऊन या पुढे नागरिकांना सहा दिवसाआड पाणी पुरविण्यात येणार असल्याचे सांगितल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या संबंधी आमच्या प्रतीनिधीने पाणीपुरवठा अधिकारी ऋतुजा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाण्याचे आवर्तन साठ दिवसांनी येत असल्याने व आवर्तनाबाबत जलसंपदा विभागाने विचारणा करूनही कुठलीही प्रतिक्रिया न दिल्याने हि सावधगिरीची पावले उचलली असल्याचे म्हटले आहे.व या बाबत आपण नाशिक जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेशी दि. 13 नोव्हेंबर रोजी पत्रव्यवहार केला असून उपलब्ध पाणी 15 डिसेंबर पर्यंत पुरेल असे म्हटले असून आपण लवकर पाण्याचे आवर्तन द्यावे अशी मागणी केली आहे.

कोपरगाव नगरपालिकेच्या साठवण तलावात 25 ऑक्टोबर रोजी पाणी घेतले आहे.व वर्तमानात या साठवण तलाव क्रं. एक मध्ये साठ द.ल.घ.फूट पाण्याची क्षमता आहे.तर दोन मध्ये 40 द.ल.घ.फूट तर 3 क्रंमाकामध्ये 170 द.ल.घ.फूट पाण्याची क्षमता आहे तर सर्वात मोठा आलेल्या 4 क्रमांकाच्या साठवण तलावात 410 द.ल.घ.फूट पाण्याची क्षमता आहे असे असताना पाणीसाठवण तलावात घेऊन 36 दिवस झाले असताना लगेच पाणी टंचाईचे बिगुल वाजल्याने नागरिकांनी कान टवकारले आहेत.यामुळे नागरिकांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close