Uncategorized
ओमानमध्ये 6 भारतीय कामगारांचा मृत्यू
संपादक -नानासाहेब जवरे
ओमानच्या एका बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी मुसळधार पावसामुळे 6 भारतीय कामगारांचा मृत्यू झाला आहे. एका पाईपलाईन प्रकल्पाच्या खोदकामाच्या ठिकाणी ढिगाऱयाखाली सापडल्याने या भारतीय कामगारांना जीव गमवावा लागला आहे. दुर्घटनेची माहिती घेतली जात असून पीडितांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे भारतीय दूतावासाने म्हटले आहे.