जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

गोदावरी दूध संघ व बायफ संस्थेच्यावतीने मोफत गोचिड निर्मुलन लसीकरण

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

केंद्रीय गोवंश अनुसंधान संस्थान मेरठ,उत्तरप्रदेश पुरस्कृत व नाशिक येथील बायफ संस्था (बी. आय. एस. एल. डी) यांच्यावतीने गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या कार्यक्षेत्रातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील दूध उत्पादकांच्या दुभत्या जनावरांसाठी मोफत गोचीड ताप निर्मुलन लसीकरण करण्यात आले असून मिनरल मिश्चरचेही वाटप करण्यात आले असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी दिली आहे.

गोदावरी-परजणे तालुका सहकारी संघाचे व दूध उत्पादकांचे नेते स्व.नामदेवराव परजणे यांच्या १७ व्या पुण्यस्मरण सोहळ्याचे औचित्य साधून बायफ व गोदावरी दूध संघाच्या संयुक्त सहकार्याने हा कार्यक्रम संघाच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात आला आहे त्याचे पशुपालकांनी स्वागत केले आहे.

दूध उत्पादकांचे नेते स्व.नामदेवराव परजणे यांच्या १७ व्या पुण्यस्मरण सोहळ्याचे औचित्य साधून बायफ व गोदावरी दूध संघाच्या संयुक्त सहकार्याने हा कार्यक्रम संघाच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात आला. संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,कृषी अधिकारी पंडितराव वाघिरे,उप अभियंता उत्तमराव पवार,पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिलीप दहे,आश्विन वाघ, संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे, बायफचे विभागीय अधिकारी डॉ.बाळासाहेब जिगळेकर, बायफचे अधिकारी सुधाकर बाबर, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे प्रकल्प समन्वयक डॉ. चंद्रकांत धंदर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात अनुसूचित जाती जमातीच्या दूध उत्पादक कऱ्यांच्या गायींना गोचिड निर्मुलन लसीकरणासह मिनरल मिश्चरचेही वाटप करण्यात आले. अनेक शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबांना दूध व्यवसायातून आर्थिक हातभार लागावा, जनावरांचे आरोग्य व्यवस्थित रहावे यासाठी संघाने बायफ संस्थेच्या सहकार्यातून या उपक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे,खंडू फंफाळे, सोमनाथ निरगुडे, बायफचे विशाल खैरे, श्री राऊत यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close